मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
जनी जाय पाणीयासी । मागें ...

संत जनाबाई - जनी जाय पाणीयासी । मागें ...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


जनी जाय पाणीयासी । मागें धांवे ह्रुषिकेशी ॥१॥

पाय भिजों नेदी हात । माथां घागरी वहात ॥२॥

पाणी रांजणांत भरी । सडासारवण करी ॥३॥

धुणें धुऊनियां आणी । म्हणे नामयाची जनी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP