मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
या वैष्णवाच्या माता । तो ...

संत जनाबाई - या वैष्णवाच्या माता । तो ...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


या वैष्णवाच्या माता । तो नेणवें देवा दैतां ॥१॥

तिहीं कर्म हें पुसिलें । अकर्म समूळ नाहीं केलें ॥२॥

कानाचे हे कान । झालें धरुनियां ध्यान ॥३॥

डोळियाचा डोळा । करुनी धाले प्रेम सोहळा ॥४॥

तोही वश्य नरदेहीं । जनी दासी वंदी पायीं ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP