मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
देव भावाचा लंपट । सोडुनी ...

संत जनाबाई - देव भावाचा लंपट । सोडुनी ...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


देव भावाचा लंपट । सोडुनी आला हो वैकुंठ ॥१॥

पुंडलिकापुढें उभा । सम चरणांवरी शोभा ॥२॥

हातीं चक्र पायीं वांकी । मुख भक्तांचें अवलोकीं ॥३॥

उभा बैसेन सर्वथा । पाहे कोडें भक्त कथा ॥४॥

सर्व सुखाचा सागर । जनी ह्मणे शारंगधर ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP