मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
दळण्याच्या भिषें । विठ्‌ठ...

संत जनाबाई - दळण्याच्या भिषें । विठ्‌ठ...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


दळण्याच्या भिषें । विठ्‌ठल सावकाशें ॥१॥

देहबुद्धीचें वैरण । द्वैत खंडारे निसून ॥२॥

एकलीच मातां । दुजा साद उमटतां ॥३॥

कोण तुझे बरोबरी । साद देतो निरंतरी ॥४॥

खूण कळली नामदेवा । विठ्‌ठल श्रोता जनीच्या भावा ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP