मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
संतभार पंढरींत । कीर्तनाच...

संत जनाबाई - संतभार पंढरींत । कीर्तनाच...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


संतभार पंढरींत । कीर्तनाचा गजर होत ॥१॥

तेथें असे देव उभा । जैशी समचरणांची शोभा ॥२॥

रंग भरे कीर्तनांत । प्रेमें हरिदास नाचत ॥३॥

सखा विरळा ज्ञानेश्वर । नामयाचें जो जिव्हार ॥४॥

ऐशा संतां शरण जावें । जनी म्हणे त्याला ध्यावें ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP