मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
पंढरीचा वारकरी । त्याचे प...

संत जनाबाई - पंढरीचा वारकरी । त्याचे प...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


पंढरीचा वारकरी । त्याचे पाय माझे शिरीं ॥१॥

हो कां उत्तम चांडाळ । पायीं ठेवीन कपाळ ॥२॥

वंद्य होय हरिहरा । सिद्ध मुनि ऋषेश्वरा ॥३॥

मुखीं नाम गर्जे वाणी । म्हणे नामयाची जनी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP