मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
यातिहीन चोखामेळा । त्यासी...

संत जनाबाई - यातिहीन चोखामेळा । त्यासी...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


यातिहीन चोखामेळा । त्यासी भक्तांचा कळवळा ॥१॥

त्याचा झाला ह्मणीयारा । राहे घरीं धरी थारा ॥२॥

देह बाटविला त्याणें । हांसे जनी गाय गाणें ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP