मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
पक्षी जाय दिगंतरां । बाळक...

संत जनाबाई - पक्षी जाय दिगंतरां । बाळक...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


पक्षी जाय दिगंतरां । बाळकांसी आणी चारा ॥१॥

घार हिंडते आकाशीं । झांप घाली पिल्लापासीं ॥२॥

माता गुंतली कामासी । चित्त तिचें बाळापाशीं ॥३॥

वामर हिंडे झाडावरी । पिलीं बांधुनी उदरीं ॥४॥

तैंसी आह्यासी विठ्‌ठल माये । जनी वेळोवेळां पाहे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP