मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
घरांत बसलेल्या काजव्यास--...

राम गणेश गडकरी - घरांत बसलेल्या काजव्यास--...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


घरांत बसलेल्या काजव्यास---

[चाल : भक्ति ग वंणी । माझी गुंफा ग साजणी ॥]

उडुनि जा स्वैर, । काजव्या, चमक बाहेर, ॥धृ०॥

वासरमणी अस्तासी गेला,
कृष्ण करी तम सर्व जगाला,
अजुनि चंद्रमा वरति न आला,

असे ही वेळ, । जा, जा, जा, तोंवरि खेळ ! ॥१॥

दिवस तुझे हे फार मजेचे,
तेज तुला हें नित्य कशाचें ?
आठवलें तुज बसणें कैचें ?

अगदिंच गौर ! काजव्या, चमक बाहरे. ॥२॥

दाट तरूंचा ती बघ राई,
चमकत चमकत तिकडे जाई,
प्रेम जसें नव-रमणी-हृदयीं,

वीज मेघांत, । जा, तैसा चमके तींत. ॥३॥

वदसि काय “ चिरसौख्य न माझें,
तेज खरें नच तें अस्थिर जें,
मिरवाया मी म्हणुनी लाजें,”

वेडा, बा रे, । हें वेड तुझ्या मनिं सारें. ॥४॥

वेद, पुराणें नच पढलासी,
न्याय, तर्कही नच शिकलासी,
म्हणुनिच ऐसा मूर्ख रहासी,

मानवी कावा । वेडया, तुज नाहीं ठावा ! ॥५॥

असेल त्याचा गर्व धरावा,
अल्प-अधिक हा भेद नसावा.
स्थिरास्थिराचा विचार जावा,

सोडुनि जातां । धन, पुन्हां धरावी लघुता. ॥६॥

“ज्ञानवंत जगिं मनुजप्राणी,
क्षुद्र इतर ” हें कोण न जाणी ?
म्हणुनी अमुच्या नियमा मानीं.

अगाची रीती । जा, ठेविं आपुल्या चित्तीं ॥७॥

सांग कसे बसलो ?

[आचरटपणाचाच आणखी एक मासला.]

N/A

References : N/A
Last Updated : November 14, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP