मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
गिरिशिखरें खरतांना त्यांत...

राम गणेश गडकरी - गिरिशिखरें खरतांना त्यांत...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


गिरिशिखरें खरतांना त्यांतुनि कण वाळूचे पडतात,

महासागरोदरीं तेथुनी विश्रांतीस्तव दडतात;

कालमापनास्तव जन त्यांना घटिकायंत्रीं भरतात,

क्षणाक्षणासह एक एक ते खालीं भरभर झरतात.

गिरिस्वरुपा उन्नतिच्या ते करिती देहाची घटना,

विस्तारास्तव शय्यारचना मग करणें लागे त्यांना;

झटति अनंतर अनंतांतही शोधायास्तव परिमाणा,

कालस्वरुप कालाचीही मोजिति घटका भरतांना;

निजकवनाचें मसिलेखन हें, पुसुनि न जावें क्षुद्र तरी,

’गोविंदाग्रज’ यास्तव त्यावरि वाळूचे कण हे पसरी !

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP