यंत्रबंधनीं तिर्यजलातें अवरोधुनि यापरी
चढविता, सांगा, कां हो वरी ?
प्रवहण भूपृष्ठावर ज्याचा सहजधर्म हा असे
स्वर्गीं चढेल कां तें असें ?
क्षणैक चढलें तरी निदानीं मातीवरती पडे;
होइल चिखल मात्र चहुंकडे !
पाट बांधुनी मार्ग सुगम त्या करुनी दिधला जरी
जगतिल माळ मळे किति तरी !
कारंजाचें चढतें पाणी पडतां खालीं असें
उदास "गोविंदाग्रज" हंसे !