राम गणेश गडकरी (१८८५ - १९१९) हे मराठीतील एक अग्रगण्य कवी, नाटककार आणि विनोदी लेखक होते. त्यांनी ’वाग्वैजयंती’ हा कवितासंग्रह ’गोविंदाग्रज’ ह्या टोपणनावाने लिहिला, तर ’बाळकराम’ ह्या टोपणनावाने काही विनोदी लेख लिहिले. त्यांनी 'एकच प्याला', 'प्रेमसंन्यास', 'पुण्यप्रभाव', आणि 'भावबंधन' ही चार पूर्ण नाटके आणि 'राजसंन्यास' हे अपुरे नाटक अशी पाच नाटके पाच अक्षरी लिहिली, तर 'वेड्यांचा बाजार' हे नाटक अपुरे राहिले.
राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.