समशेर दुधारी दिसतां । कां भीसी ऐसा का रे ? ॥
मरणाची मिळकत लोकीं । तूं मी हें विश्वचि सारें ॥
या कीं त्या धारेवरती । मरणाचें लागे बा रे ॥
॥चाल॥ जरि शेवट एकचि साचा ॥
मग वृथा वाद दोघांचा ॥
कोणीही कोठें नाचा ॥
तो नाच जरि प्रेमाचा !
प्रेमांतचि होवो कांहीं । मग वादचि राहत नाहीं ॥१॥