राम गणेश गडकरी - " सुखदुःखांच्या द्वैतामधु...
राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.
"सुखदुःखांच्या द्वैतामधुनी दुःख सदा वगळावें;
सुख सेवावें, " हीच वासना सामान्यांची धांवे. ॥१॥
एक पायरी चढतां वरतां मानवता मग बोले,
"सुखदुःखांची समता आहे; एकानें नच जग चाले."॥२॥
सदा भरारी गगनीं ज्यांची ऐसे कविवरही वदती,
"संसाराच्या गाडयाचीं हीं दोन्हीं चाकें जणुं असतीं !" ॥३॥
परि सुखदुःखां पुढें टाकुनी, वदतां "घे जें रुचे तुला,"
अचुक सुखाला उचली मानव; दुःखा त्याची न ये तुला.॥४॥
यापरि जगतीं सुखदुःखांचें खरें मर्म ना कळे कुणा,
रुचे मला तर दुःख सुखाहुनि; वेडा वाटे तरी म्हणा ! ॥५॥
सुख निजभोगीं नरा गुंगवी विसर पाडितें इतरांचा,
दुःख बिलगतेम थेट जिवाला; ध्वज फडकवितें समतेचा. ॥६॥
सुख उद्दाम करी आत्म्याला ओळख ज्याची त्या नसते,
कोण कुणाला पुसतें जागें या दुःख जरि मुळीं ना वसतें ! ॥७॥
गर्भवासगत अधपणानें दिशाभूल होवोनी,
परक्या ठायीं आत्मा आला स्वस्थानातें त्यजुनी. ॥८॥
परमात्म्यापर्यंत तयाला पुन्हां असे जें जाणें,
नांव तयाला दिलें गोडसें कीं ’जीवाचें जगणें.’ ॥९॥
परि ’जगणें’ ही मुदत ठरविली मूळपदा जायाची
सदा चालतां आत्मा तरिही मजल न संपायाची. ॥१०॥
इष्ट पदा ने दुःखभोग हा प्रवास आहे आत्म्याचा
विश्रांतीचा मुकाम अगतिक काळ जात जो सौख्याचा. ॥११॥
दुःख असे कर्तव्य; तयाची जाणिव पटते जीवाला,
इंद्रियांस वरच्यावर शिवुनी सौख्य जातसे विलयाला. ॥१२॥
मजल मारणें इष्ट जयाला ठरलेल्या मुदतीमाजीं
प्रवास दुःखांचा भोगाया त्यानें व्हावें राजी.
N/A
References : N/A
Last Updated : October 25, 2012
TOP