मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
तुटे स्नेहसंबंध सर्वस्विं...

राम गणेश गडकरी - तुटे स्नेहसंबंध सर्वस्विं...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


तुटे स्नेहसंबंध सर्वस्विं आतां । टाकितां तूं असें या अनाथा ॥धृ०॥

सात वर्षें, सखे ! हर्षद स्वप्न जें । पाहिलें, भोगिलें तेंच आतां ।

घोरतिमिरा निशा सहज भय देतसे । जीव हा एकला आज उरतां ॥

अश्रुधारा पहा वाहती निर्भरा । चित्त विव्हल; नसे वृत्ति शांता ।

नयनजलिं नाहतां, त्यासवें वाहतां । पाहिना तुजविना जीव जगता ॥

जीवनव्याप हा व्यर्थ वाटे पहा । नयनविषयाच ही विश्‍वसंस्था ।

कांहिं नाहीं पुढें, जीव तिमिरीं बुडे । स्तिमित वा बधिर वा जात अंता ॥

नाश तरि सर्वथा होउं दे एकदां । आपदा लोपवी रे कृतांता !

कष्टला जीव हा दुःखामात्रावहा । शून्यता जीविताप्रति वहातां ॥

यत्‍न केले सखे ! रत्‍न तुजसारखें । कविं तरी व्हावया प्राप्त हातां ।

अन्य घटना परी नाकळे कां करी । देव कीं दैव कीं तो विधाता ! ॥

जन्म हा व्यर्थसा होत ! होवो तसा । सर्वथा शिवपरा ईशसत्ता ।

प्रेमयज्ञाप्रति प्रथम ही आहुति । अपरिहार्याच जी जीवजाता ॥

एक आशा उरे--( तीच परि मज पुरे ) । तिजसवें जीव करि एकमयता ।

"जन्मजन्मांतरीं एकदां क्षणभरी । प्रेम लाभो तुझें शोकधाता" ॥

अनुष्टुभ‌

भावोल्लेखार्थ आलेखी कष्टदें शोकनिग्रहें ।

"गोविंदाग्रज" हें बोले ! अंतिम प्रेमगीत हें ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP