मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
माझी पहिली कविता

राम गणेश गडकरी - माझी पहिली कविता

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


आर्या

चष्मा लावुनि डोळ्यां डोकिस पागोटि तांबडी घाली ।

काटी टेंकित टेंकित येऊनि बैसे पथारिच्या खालीं ॥१॥

नदीस पूर आलेला पाहून

विरहोत्सुक सागर झाला ।

प्रियसखीस भेटायाला ॥मज गमे॥

निजमित्र मेघ पाठविला ।

गिरिराज श्वशुर-सदनाला ॥मज गमे॥

सरिता ही सागरजाया ।

त्यासवें निघाली जाया ॥मज गमे॥

आकांत । करित अत्यंत । ठेवितां तात ।

तिजसि उतरोनि ।

भूवरती तटकटिवरुनि ॥मज गमे॥

तो प्रसंग जणुं बघवेना ।

म्हणुनी रवि झांकी नयनां ॥मज गमे॥

घन गाळिती अश्रूधारा ।

दुःखें नच वाहे वारा ॥मज गमे॥

शिवमंदिरिं भगिनी गिरिजा ।

भेटे तिस सागरभाजा ॥मज गमे॥

यापरी । सिंधुमंदिरीं । जात सुंदरी।

पूर्ण जलसरिता ।

शिवगिरिजा दर्शनमुदिता ॥मज गमे॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP