मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
आठवतो का सांग , सखे ! तो...

राम गणेश गडकरी - आठवतो का सांग , सखे ! तो...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


आठवतो का सांग, सखे ! तो काळ विवाहाचा

बाळपणाचा, मुग्धपणाचा, निर्मळ भावाचा ?

संसाराचें चित्र चिमुकलें, चिमुकलेच जीव

फुललें नव्हतें हृदयांचेंही राजस राजीव !

पाहत होते तात तदा त्या लीला बालांच्या,

जणुं आठवती त्यांसहि लीला त्याच सुकालाच्या ।

जपति परोपरी प्रसन्नहृदया पुण्यमया माता ।

गेले ते दिन, सीते, यापरि, हा ! बघतां बघतां ॥

बाळपणींचे प्रसंग जणुं ते घडति आज फिरुनी ।

चित्रपटा या अश्रुजलानें चल टाकूं धुवुनी ।

तूं सीता ती; राम तोच मी; त्याच आज माता ।

परि जे गेले दिन ते आतां येतिल का हाता ?

कशास आशा नसती आतां-झालें तें गेलें !

सुकलें फूल न देत वास जरि अश्रूंनीं भिजलें !

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP