मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
अंधपणें मी पाहत होतों माझ...

राम गणेश गडकरी - अंधपणें मी पाहत होतों माझ...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.

अंधपणें मी पाहत होतों माझ्या प्रेमाची मूर्ति ॥

जीवनदेवी, जी हृदयातें देई दिव्याची स्फूर्ति ॥

मम अंधत्वा वाटत होती ती सौंदर्यें अप्रतिमा ॥

अमर्याद आशेच्या राज्याचीही उल्लंघी सीमा ॥

न कळे निर्दय दया कुणाला मजविषयीं ही कां आली ॥

प्राणघातपर उपकाराची इच्छा कोणाला झाली ? ॥

अमोघगुणदिव्यांजन दुर्लभ----हाय ! तेंहि परि सांपडलें ! ॥

विनायत्‍न या उभयहि नयनीं नेमकेंच कां हो पडलें ?॥

स्पष्ट दृष्टि मज अंधाप्रति ही कशी लाभली अवकाळीं ॥

सतेज निजकिरणांनीं जी मृदु जीवा जगता जाळी ॥

कृष्णवर्ण हा-प्रमाण कांहीं अवयवास या मुळिं नाहीं ॥

कुरुप दर्शनतापद असली बाला ही पुढती राही ॥

दृष्टि लाभतां मूर्तिभंग हा-मनोभंगही जन्माचा ! ॥

शतिविध हानीहूनही असला लाभचि दुःखप्रद साचा ! ॥

दृष्टि लाभतां पहावयाचें असें तेंच उरलें न परी ॥

’गोविंदाग्रज’ अंधत्वास्तव विलाप आतां सदा करी ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP