मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
घास घे रे तान्ह्या बाळा ।...

राम गणेश गडकरी - घास घे रे तान्ह्या बाळा ।...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.



घास घे रे तान्ह्या बाळा । गोविंदा गोपाळा ।
भरवी यशोदामाई । सांवळा नंदबाळ घेई ॥धृ०॥

घेईं कोंडा कणी । त्रैलोक्याचा धणी ।
विदुराघरींचा । पहिलावहिला घास ॥१॥

पोहे मूठभरी । क्षीराब्धीचा हरी ।
मैत्र सुदामजीचा । आला दुसरा घास ॥२॥

थाळी एक्या देठीं । घ्यावी जगजेठी ।
द्रौपदीमाईचा । आला तिसरा घास ॥३॥

उरल्या उष्टावळी । फळांच्या वनमाळी ।
शबरीमिल्लिणीचा । घ्या हो चवथा घास ॥४॥

टाकूं ओवाळून ! मुखचंद्रावरून ।
“गोविंदाग्रजा” चा । उरलासुरला घास ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 14, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP