मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
मोगर्‍याचा हार

राम गणेश गडकरी - मोगर्‍याचा हार

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


मुलगा -

हा हार शुभ्र किति आई ।

किति कोमल सुंदर पाहीं ॥क्षणभरी॥

किति वास मधुर या येई ।

मम चित्त ओढुनी घेई ॥बघ तरी॥

कशिं फुलें डंवरलीं असतीं ।

किती अलंकार त्यापुढती ॥बहुपरी॥

भूवरी ।जन्म घे तरी । वास जनशिरीं ।

कसा हा मिळवी ।

जनमनें कशानें वळवी ॥ वद तरी ॥१॥

आई -

मधुवासें प्रिय हा सकलां ।

स्वगुणांनीं तूं हो बाळा ॥त्यापरी॥

हा धवलत्वें सुंदरसा ।

चारित्र्यें शोभे तैसा ॥तूं तरी॥

हा दिपवि जसा नगभारा ।

तेज तूं लोपविं धीरां ॥त्यापरी॥

यापरी । वागशिल जरी । सकल जन तरी

तुजसि मम तनया ।

शिरिं धरितिल हारासम या ॥ कधिं तरी ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP