मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
चित्रपटावरि रम्याकृतिच्या...

राम गणेश गडकरी - चित्रपटावरि रम्याकृतिच्या...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


चित्रपटावरि रम्याकृतिच्या सीमारेषा परोपरी;

रंग कधीं वठतील परी ?

कानाला आनंद देति हे झुळझुळ गाउनि गोड झरे;

अर्थ कधीं कळणार बरें ?

अंधुक अंधुक गोड भावना डोकावति कविमनाकडे;

शब्द कधीं होतील खडे ?

सतेज वचनें देई तारा, परी लकाके नभामधीं;

खालीं येईल परी कधीं ?

झांपड पडते डोळ्यांवरती---चिंता छळिता हृदंतरीं;

झोंप कधीं येईल परी ?

प्रतिरात्रीं हीं स्वप्नें दाविति इच्छाचित्रें जीवाचीं;

सृष्टि कधीं होइल त्यांची ?

अंधनयनिं ही बघते आशा विश्वचि हें रम्याकार;

जगीं कधीं तें दिसणार ?

आणि वल्लभे ! दिलींस वचनें; गोड अहा तीं किती तरी !

खरी कधीं होणार परी !

’गोविंदाग्रज’ जें जें आळवि कवनीं-आणिक-मनामधीं;

पटेल तें तें सांग कधीं ?

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP