मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
गुणि बाळ असा जागसि कां रे...

राम गणेश गडकरी - गुणि बाळ असा जागसि कां रे...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


गुणि बाळ असा जागसि कां रे वायां ? ॥ नीज रे नीज शिवराया ॥धृ०॥

अपरात्रीचा प्रहर लोटला बाई ॥ तरि डोळा लागत नाहीं ॥

हा चालतसे चाळा एकच असला ॥ तिळ उसंत नाहिं जिवाला ॥

निजवायाचा हरला सर्व उपाय ॥ जागाच तरी शिवराय ॥

चालेल जागता चटका ।

हा असाच घटका घटका ।

कुरवाळा किंवा हटका ।

हा कष्टविशी तुझी सांवळी काया ? ॥ नीज रे नीज शिवराया ॥१॥

ही शांत निजे बारा मावळ थेट ॥ शिवनेरी जुन्नरपेठ ॥

त्या निजल्या ना तशाच घांटाखालीं ॥ कोंकणच्या चवदा ताली ॥

ये भिववाया बागुल तो बघ बाळा ॥ किति बाई काळा काळा ! ॥

इकडे हे सिद्दि -जमान ।

तो तिकडे अफजुलखान ।

पलिकडे मुलुखमैदान ।

हे आले रे तुजला बाळ धराया ॥ नीज रे नीज शिवराया ! ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP