मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
सार्‍या त्या कविता तशाच अ...

राम गणेश गडकरी - सार्‍या त्या कविता तशाच अ...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


सार्‍या त्या कविता तशाच असती; ते अर्थही त्यापरी ।

शाळाही अजुनी नवीच दिसते त्या रम्य जागेवरी ॥

**! वाहतसे भरुनि दुथडी ’उल्हास’ तेव्हां जशी ।

गेला वाहुनि काळ तो, सकळ तीं सौख्येंहि त्यांचीं तशीं ॥१॥

आनंदें भरलें असें जग तसें आतांहि **!पहा ।

** ही असतील त्यापरि किती लोकांत रम्य अहा ॥

प्रेमाचीं नवजीवनेंहि दिसतीं स्वच्छंद चोहींकडे ।

ज्याचें त्यास नसे तरी जगभरी शून्यत्व ये रोकडें ॥२॥

बाले, दृष्टि मनोहरा मजवरी तूं टाकिलीं ज्या क्षणीं ।

गेला तो क्षण सांग सांप्रत कुठें ? हें शल्य राहीं मनीं ॥

काळाच्या उदरांत खोल दडला जाऊनि कोठें तरी ।

** ! शोकच शेष आज उरला प्रेमांतुनी अंतरीं ॥३॥

विद्यादानिं नसे विशेष गति त्या बाल्यांत आम्हां तशी ।

प्रेमाचा पहिला धडा गिरविला निर्दोषशा मानसीं ॥

** ! तीं वचनें मरुन पडलीं; पद्यांत त्यां पाठवी ।

"गोविंदाग्रज" आज विव्हल मनें, ** ! तुला आठवी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP