मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
शेवटची कविता ! माझी शेवटच...

राम गणेश गडकरी - शेवटची कविता ! माझी शेवटच...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


शेवटची कविता ! माझी शेवटची कविता ! तिला प्रस्तावना काय लिहूं ? कविता ! उद्यांची अनाथ कवितादेवी-देवि, तूंच काय लिहावयाचें तें लिही !

शांत शांत दशदिशा, शांतवा तुमचे दशभाग,
शांत जरा व्हा सुरासुरांनो, सकळ महाभाग !
अवकाशांतिल वायुसागरा, लाटा करि बंद,
जलचक्रा, तव फिरत्या झुळुकी ठेव जरा बंद !
देवदूत हो पाउल बाजवुं नका, व्हाच शांत !
भूतांनो, क्षण बंद करा हा तुमचा आकंत !
प्रकाशांतल्या अणुरेणुंनो, बंद करा नाच !
काळोखाच्या रजःकणांनो करा सहन जाच !
नका सळसंळूं देऊं तरु हो, तुमच्या पानांना,
श्वासहि सोडुं न द्या लतिकांनो, कोमल कुसुमांना !
फुलत्या कलिकांनो, ठेवा ग स्तव्ध हृदयपात्र,
अर्धीं उघडीं तोडें तशींच ठेवा क्षणमात्र  !
नक्षत्रांनो, चमकेची ही नकोच चाहूल,
काळा, पळत्या क्षणाक्षणाचें थांबवि पाऊल !
हृदया, धडधड करिशी कां रे, तूंच कसें फिरशी ?
कोंड झालि तरि, जीवा धडपड करी मुळीं न अशी !
महाभाग हो, या आज्ञेचा मानुं नका राग,
आज्ञा नच ही परी करपल्या आशेची आग !
स्वाप्नामधल्या स्वप्नांतहि मज येत काळझोंप,
म्हणुनी हृदयांतुनी उपटितो नवलाचें रोप !
राग नक धरूं हतभाग्याचा ऐकुनि आकांत,
शांत शांत परि जिकडे तिकडे व्हा सारें शांत !
वाहुं द्या हा मम कवितेचा प्रवाह शेवटचा,
ऐकूं द्या हा तिजला माझा निरोप शेवटचा !
ऐकिलेंस ना-देवि, काय हें, कसला हा पूर ?
रडशी कां वद, तुझें हृदयही झालें का चूर ?
होय देवते, कविते, करितों मीच तुझा घात,
हा मातेच्या पहा गळ्यावर बाळाच हात !
सावध सावध देवि शारदे, क्षणभर दे कान,
चराचरांनो, निरोप ऐका, व्हाच सावधान !
गा विहगांनो, कवीश्वरांनो, गगनगायकांनो !
हंसा मुलांनो, हंसा फुलांनो, हंसा तारकांनो !
ऐकत नाहीं मी त्या तुमच्या मादक मुरलीला,
पाहत नाहीं सौंदर्याच्या मोहकतर लीला !
कुंदलते, करि कुंदकळ्यांनी हंसुनी उपहास,
गडया गुलाबा, झाडावरतिंच हवा तसा हांस !
मार भरारी गरुडा, गगनीं; मी येतच नाहीं,
हे प्रतिभेचे पंख कपितों माझ्या हातांहीं !
चमक सारखी इकडुन तिकडे तूं चंचल बिजली,
स्थिरावली कल्पना जागच्या जागीं ती थिजली !
फूलपांखरा, तुझी तरलता फुलांफुलांवरती---
नाचूं दे: परि तरळ मना मी खिळिलें जड जगतीं !
खुशाल आम्रा, मज मदनाचे पुष्पबाण मार,
ही सोनेरी ढाल रुप्याची हातीं तरवार !
आईच्या मांडीवर पाहुनि मेलेलें मूल,
पडावयाची नाहीं आतां मम चित्तां भूल !
नवयुवतींच्या नेत्रकिरणिं कुणि जरि केली जाळीं,
तोडिन तरि मी क्षणाधींत ती सारीं या काळीं !
राधारमणा श्रीकृष्णा, तूं बंद करी मुरली,
मनिंची मनांत जिरविन इच्छा जी उललीसुरली !
कलगीसाठीं कुणी धांबला जरी तुरेवाला,
लागाबांधा तुटला आतां, सलाम हा त्याला !
मज रिझवाया कालिदास वा येऊं द्या बाण,
नीरसतेचें चिलखत करि मज अभेद्य पाषण

N/A

References : N/A
Last Updated : November 16, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP