स्त्री. दही .
पुस्त्रीन . (विशिष्ट विद्या , कला , भूषण , वस्तु , चिन्ह इ० ज्या जवळ आहे अशा अर्थीनामाला लागून त्याचें विशेषण बनविणारा संस्कृत प्रत्यय . वान हा हि असाच प्रत्यय आहे ). जसें - बुद्धिमा ( वा ) न . शक्तिमा ( वा ) न इ० प्रत्ययाचीं तिन्ही लिंगांचीं रुपें जरीं वर दिलीं आहेत तरी यांनां विभक्ती प्रत्यय लागून तयार झालेलीं रुपें क्वचितच आढळतात . [ सं . मत ]
पु. - ग्रीवा ; गळ्याचा मागचा भाग .
- चिकण माती .
- आदर ; मुरवत ; पूज्यबुद्धि ; सत्कार ; गणना . एथ आलेआं तुमचा मानु किती । वाढीन्निला । - शिशु १८१ .
- तोरा ; दिमाख ; स्वतःचा किंवा स्वतःसंबंधीं माणसें , वस्तु , देह इ०
कांचा अभिमान ; अहंता . जया पुरुषांचें कां मन । सांडोनि गेलें मोह मान ।
- ज्ञा १५ . २८५ .
- गळ्यास होणारा रोग .
- ( व . ) तांबूस रंगाची टणक जमीन .
- ( औषधाचा ) गुण ; आराम . वैद्याच्या औषधानें मान वाटतो कां कांहीं ?
- ( बे . ) कोंकण व देश यांच्या सरहद्दीतील काळे कांटे .
न. प्रमाण ; अवसान ; आटोका . ' तिकडून हावभर होऊन जडगीर होईल आणी यावयास लागेल ते समई बरा मानात येइल तेव्हा येक समयावच्छदे यालगार करून गनीम नाहींसाच करावा .' - पेद ३३ . २९ . ( सं .)
मानट न . ( कों . ) नापीक जमीन ; पीक चांगलें होत नसून गवत फार येतें अशी जमीन .
मानटी वि . - ( कों . ) भिकार ; भुकिस्त ( जमीन , तिजवरील पीक ).
- ( अशुद्ध ) गळा . घास मानेंत अडकला .
- अधिकार ; हक्क ; इलाखा ; सत्ता . लग्नामध्यें उपाध्यायाचा वस्त्र घेण्याचा मान आहे .
- ( नृत्य ) नृत्यांतील मानेच्या चलनवलनाचे प्रकार ( सम , नत , अंचित ,
कुंचित , रेचित , पार्श्वोन्मुख , निवृत्त , त्र्यस्त्र व उन्नत हे ते
नऊ प्रकार होत ). [ सं . मन्या ; फ्रेंजि . मेन ] ( वाप्र . )
०अडकणें पेंचांत , संकटांत सापडणें .
कामगिरी ; प्रतिष्ठा ; अधिकार . नाहीं - होय म्हणण्याचा मान सासूबाईकडे आहे .
०कंबर करप - ( गो . ) मान खालीं वांकवून कामास लागणें .
परिमिति ; परिमाण ; इयत्ता ; माप ( पदार्थाची लांबीरुंदी , महत्त्व , संख्या यांचें अथवा काल , देश , गुण याचें ). मज अमेया मान । - ज्ञा ९ . १५९ .
ज्याच्या योगानें एखादें परिमाण निश्चित करितात तें ; वजन , लांबी , अवकाश , वेळ इ०कांचें कोणतेंहि माप . मास म्हणून कालाचें एक मान आहे .
एक करप - ( गो . ) मान खालीं वांकवून कामास लागणें .
आधार ; प्रमाण ; गमक .
०कांट्यावर - ( एखाद्यानें ) अति गर्विष्ठ , उद्दाम किंवा मगरुर असणें .
प्रमाण ; तुल्यता ; अव्हेरिलें कवणें मानें । - ज्ञा १ . ९२ .
नसणें - ( एखाद्यानें ) अति गर्विष्ठ , उद्दाम किंवा मगरुर असणें .
रीत ; रिवाज ; चाल . नाना क्षीरापति मान पद्धति । - सप्र २० . ३७ .
०कापणें एखाद्याच्या उपजीविकेच्या साधनाचा नाश करणें ; मुंडी मुरगाळणें .
न. परिस्थिति पण तेच आंटनीनें आपल्या करुणरसभरित भाषणास प्रारंभ करतांच सगळें मान एकदम फिरुन गेलें . - नि .
वयोमर्यादा ; जगण्याची सीमा . हल्ली ५० किंवा ६० हेंच आयुष्याचें मान झालें . - टि ४ . १४० .
विश्वासघात करणें ; फसविणें .
( महानु . ) वृत्तांत . ऐसें मान आइकौनि । - धवळेपू २३ .
मोठी हानि करणें .
नेम ; टीप ; निश्चय ( काल , स्थल , कर्ता , सुमार यासंबंधीं ). पर्जन्य केव्हां कोठें किती काय कसा पढेल ह्याचें मान कोण्हाचें हातीं लागत नाहीं .
०खालीं -युक्तता ; वाजवीपणा ; औचित्य ; जरुरी . राजा दुष्ट झाला . आतां एथें राहण्याचें मान राहिलें नाहीं .
घालणें -६ मोठेपणाची , महत्त्वाची पदवी ; उंची ; सुमार ; मजल ; पायरी . त्या गृहस्थाचें अलीकडे मान चढलें आहे .
डोकें खालीं घालणें ; नांगी पडणें .
दर ; योग्यता ; उच्चता : किंमत . गाड्याचें , भाड्याचें , धान्याचें , गुळाचें मान चढलें - वाढलें - उतरलें - बसलें - फिरलें - उलटलें - बदललें . [ सं . मा = मापणें ]
म्ह०( ल . ) अपामान सहन करण्याचा प्रसंग येणें .
मानो हि महतां धनं ।
०चोळणें ( व . ) कांकूं करणें .
मानें व खाई पानें पडपडल्या खाई कांदे = कादे खाण्यांत आनंद पावण्याइतक्या नीच स्थितीस आलेल्या गर्विष्ठ माणसासंबंधीं योजतात .
०टाकणें थकणें ; शक्तिहीन , निर्बल होणें .
मान जना , अपमान मना ( सांगावा ); मान सांगावा जना ; अपमान सांगावा मना . ( वाप्र . )
मानावर जाणें - क्रि . ( खा . ) इष्ट देवतेचा नवस फेडणें . साधितशब्द -
मानाचा - वि . मानाचा हक्क असणारा . जसें - मानाचा धनी - पाटील - देशमुख - देशपांड्या इ० . मानकरी पहा .
मानाचा तुकडा - पु . क्षुद्र देणगी , पदवी . ते देतील तेवढाच भाकरीचा किंवा मानाचा तुकडा घेऊन ... - टि २ . ५४ .
मानाचें पान - न . द्रव्यदृष्ट्या अल्प मोलाची परंतु जिच्या योगानें मान दिला जातो अशी कोणतीहि देणगी , सत्ता अथवा मालमत्तेची बाब .
म्ह० मानाचें पान गोड . सामाशब्द -
०टोकाविणें मानेनें खुणा करणें .
०डोलवणें हालविणें -०करी पु. ( अधिकार , नातें , गुण इ०कामुळें ) दरबार , सभा , लग्न , उत्सव , ग्रामसभा इ० ठिकाणीं विशिष्ठ मान व नजराणा घेण्याचा हक्क असलेला मनुष्य ; आदरणीय , माननीय मनुष्य .
रुकार , पसंती , प्रशंसा करण्यासाठीं मान हालविणें ; पसंती दर्शविणें ; वाहवा , कौतुक करणें .
कबूल करण्यास भाग पाडणें .
राजा - राणीचे आप्तेष्ट ; यांस काहीं नेमणूक असते . ( गो . ) मानकर .
०ताठ - स्वाभिमान राखणें .
०कीन धनी - पु . ( व . घाटी . ) मानाचा मनुष्य .
- खंडना - स्त्री . अनादर ; अपमान ; अवमान करणें . [ सं . मान + खंडना ]
ठेवणें - स्वाभिमान राखणें .
०णूक स्त्री. नवस ; ईश्वर , पिशाच यांच्या पुढें घेतलेली शपथ .
०तुकविणें वाहवा , कौतुक करणें . काय जिणें जर न घडे करणी तुकवी जियेस जग मान । - विक ६५ .
मानपान . [ मानणें ]
०धरणें सक्रि
( ल . ) ऐन आणीबाणीच्या प्रसंगीं एखाद्यास अडविणें .
०धन न. मानरुपी धन . - वि . मान ( दिमाख , ताठा ) हेंच ज्याचें धन आहे असा ; मानी . [ मान + धन ]
०नीय वि. पूज्य ; मान्य ; विश्वासार्ह ; मान देण्यास , विश्वास ठेवण्यास , मान्य करण्यास योग्य . ( व . ) मानधारी .
अक्रि . मानेस कांहीं विकृति झाल्यामुळें ती आखडणें , इकडे तिकडे वळवितां न येणें .
०मुंडी , मुरगाळणें -०पट्टी स्त्री. प्रमाण मोजण्याची पट्टी ; स्केलपट्टी .
०पत्र न. मान्यता करणारा लेख . [ सं . ]
मुरगाळणे , मुरगाळणें -( एखाद्याचा ) आशाभंग करणें ; नाश करणें .
०पान पु. मानकर्याचे हक्क ; लग्न , मुंज इ० प्रसंगीं मानकर्यास दिलेले मान व नजराणे ; आदरसत्कार .
पूर्णपणें लुटणें .
०मोडणें गांवच्या पिढीजाद अधिकार्याचे हक्क .
एखाद्या कामाचे संबंधीं अधिकार व हक्क . [ मान + पान ; मान द्वि . ]
( राखून ठेवलेला पैसा इ० ). नाइलाजास्तव किंवा नाखुषीनें खर्च करणें . पांचशें रुपयांची मान मोडली तेव्हां लग्न झालें .
०बरळे वि. ( महानु . ) गर्वानें ( वाटेल तें ) बरळणारें . तंव रतिरसिकां भणि तलें । आंवो आंवो मानबरळें । - शिशु २१८ .
थोडक्या खर्चासाठीं मोठ्या नाण्याला हात लावणें . चार पैशांकरितां रुपयाची मान मोडावी लागली .
०भंग पु. अनादरानें , अपमानानें वागविणें .
अपमान ; परिभव ; मानहानि . [ सं . मान + भंग ]
०मरातब पु. आदरसत्कार .
०मर्यादा स्त्री. आदर ; मान्यता ; भीड ; मुरवत . ( क्रि० ठेवणें ; राखणें ).
०मान्यता स्त्री. ( पदवी , विद्या इ० असलेल्या मनुष्याचा ) वाजवी मानसन्मान , आदर उपचार करणें . त्या दरबारांत त्याची मानमान्यता मोठी आहे .
सन्मान्यपणा ; मान , वंदन करण्याची पात्रता . [ मान + मान्यता ]
०म्हातारी स्त्री. प्रौढ स्त्री ; वागणुकीचें व गांभीर्याचें अनुकरण करणारी लहान मुलगी ; लहानगी आजीबाई . [ महान + म्हातारी ]
०वती स्त्री. स्त्री. ( नाट्य ) आपल्या प्रियकरावर रुसलेली कामिनी ; मानिनी . - वि . मानवत म्हणून एक पेठ आहे . तेथें तयार झालेलें ( पागोटें इ० ). [ सं . ]
०वस्त्र न. सन्मानार्थ दिलेलें वस्त्र . वोपिलें पताका मानवस्त्रें । - दावि ४७४ .
०वाईक वि. ( व . ) मान देण्यास योग्य ; मानकरी .
०हानि स्त्री. अपमान , मानभंग . [ सं . मान + हानि ]
मानार्ह वि . मान देण्यास योग्य . [ सं . ]
मानणें सक्रि .
आज्ञा पाळणें ; पूज्य समजणें .
विश्वास ठेवणें ; भरंवसा धरणें ; मान्य करणें ; कबूल करणें ; खरें , बरोबर आहे असें धरणें . तूं जरी हें ऐसें मानसी । तरी खेदु कां करिसी । - ज्ञा २ . १६२ .
गृहीत धरणें ; लेखणें ; भावणें ; गणणें . विष्णु व शिव निराळा असें मानीत नाहींत .
किंमत बाळगणें ; मोजणें ; विचारणें ; महत्त्वाचें गणणें . ज्याचा एकदां पराजय झाला त्यास कोण्ही मानीत नाहीं .
मानवणें ; सुखावह होणें ; आरोग्यकारक पथ्यकारक असणें ( हवा , पाणी , अन्न इ० ). येथील पाणी मला मानतें .
मर्जीस येणें ; आवडणें ; रुचणें . माझे मनास जें मानील तें करीन .
वाटणें ; आवडणें . हा मन मानेल तेंच करील .
नवस करणें . [ सं . मन = विचार करणें ; प्रा . मण्ण ; पं . मन्नणा ; सिं . मनणु ; गु . मानवुं ; हिं . मानना ]
म्ह० मानला तर देव नाहींतर धोंडा = मूर्तीपूजक लोक दगडाच्या इ० मूर्तींना देवाप्रमाणें भजतात . तदितर लोक मूर्तोना कांहींच मान देत नाहींत . यावरुन मान हा दुसर्यांनीं करावा तेव्हांच होतो . नाहीं तर तो होत नाहीं .
मानवणें - अक्रि .
कबूली , परवानगी , रुकार ह्याकरिता मान हालविणें ; पटणें ; कबूल होणें .
संतुष्ट होणें . म्हणौनि मानवले सारंगपाणी - धवळेपू ४९ .
अनुभवास येणें . ऐसें एकत्वें मानवे । - ज्ञा ९ . २४७ .
मान देणें .
सोसणें ( हवा , पाणी ).
मानवली - स्त्री . ( व . ) देवीच्या नवसाची सुवासिनी .
मानविणें - सक्रि . मन वळविणें ( रुकार देण्यास , मान्य करण्यास , आवडण्यास ). लग्न करण्याविषयीं त्याचें मन मानवा . या अर्थी ह्या क्रियापदाचा बहुधा मन शब्दाशीं प्रयोग होतो . - अक्रि . रुचणें ; आवडणें ; मान्य होणें . आजची कथा आम्हास मानविली . [ मानणें ]
मानवणी , मानवीण - स्त्री .
( लग्न , श्राद्ध इ० प्रसंगीं ) मृत सुवासिनी स्त्रीची प्रतिनिधीभूत मानलेली सुवासिनी . मानवणींच्या सुवासिनी किती आहेत ? - ऐरापु ४४१ .
( व . ) मृत सवतीच्या नावानें देव्हार्यांत बसविलेली प्रतिमा , टाक .
एक क्षुद्र देवता . बाळा बगुळा मानविणी । - दा ४ . ५ . १६ . [ मानणें = गृहीत धरणें ]
मानाविणें - सक्रि . ( काव्य ) मान देणें ; आदर करणें ; सन्मान राखणें . मानावया जगा व्हावी द्रव्यमाया । नाहीं तें माझिया जिवा चाड ।
मानिजणें , मानीजणें -पर्वा करणें . दुर्वार वाडवशिखेस न मानिजेलें । - र ३९ .
मानिलें जाणें . मानीजेसी थोर थोरी नाहीं । तुगा १०८ .
मानित - वि . मान दिलेला ; आदरिलेला ; आज्ञा पाळलेला ; सन्मान केलेला . [ सं . ]
मानिनी - स्त्री . ( नाट्य )
आपल्या प्रियकरावर रागावलेली , मानी स्त्री . मानवती पहा . ते साचचि धर्माची मानिनी । - एभा १ . २०९ .
स्त्री. [ सं . ]
मानिया - पु . मानी पुरुष . कां मानिया निस्तेजा । निकृष्टास्तव । - ज्ञा १६ . १७५ . [ मान ]
मानी - वि .
गर्विष्ठ ; ताठेबाज ; चढेल .
दुराग्रही ; हट्टी . जो मानी म्हणतो यमपुरपथहित सामपथ नका माते । - मोभीष्म ७ . ४१ .
तेजस्वी ; उदार ; थोर मनाचा . [ सं . ]
मानीव - वि . मानलेला .
मानेच्छु , मानेपाष्टी - वि . मान , आदर इ० इच्छिणारा ; योग्य मानाविषयीं आग्रह धरणारा ; मानासाठीं हपापलेला . [ सं . ]
मान्य - वि .
आदरार्ह ; पूज्य ; मानमान्यतेला , योग्यतेला योग्य . विद्या भोगसुकीर्तिदायक पहा ते मान्य मान्यासही ।
प्रशस्त ; अभिमत ; अनुमत ; पसंत . शास्त्रीबुवांची ही स्पष्टोक्ति माधवरावांना मान्य झाली .
तयार ; कबूल ; राजी . [ सं . ]
मान्य करणें - कबूल करणें ; न्याय्य , बरोबर , खरें मानणें .
प्रश्न , सूचना मान्य होणें , मान्य होणें - प्रश्न , सूचना ह्यांस संस्थेच्या नियमांत अवश्य असलेलें बहुमत मिळणें . - सभा ७३ .
मान्यपूजन - न . मानास पात्र असलेल्यांचा सन्मान करणें .
मान्यता - स्त्री .
आज्ञा पाळणें .
विश्वास ठेवणें .
मान ; आदर ; मुरवत . ज्यासि अग्रपूजेची मान्यता । - एभा १० . ६१३ .
भारदस्तपणा ; पत ; योग्यता ( मान , आदर , समाचार यांविषयींची ).
कबुली ; अनुमति ; संमति . [ सं . ]