प्रायश्चित्तमयूख - आरंभ
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
॥श्री॥
॥ श्री गणेशायनमः॥
नमामि भास्वत्पदपंकजं तत् श्रीनीलकंठोऽहमथ प्रकुर्वे।
स्मृत्वोपदेशान् गुरुशं करस्य विनिर्णयं पापविशुद्धिहेतुं ॥१॥
प्रतारकैरा दृतमत्र किंचिन्मया तु निर्मूलतया तदुझ्झितं।
ऊनोक्तितातोनहि तेन काचित्खपुष्पहीनापचितिर्न हीयते ॥२॥
मी ‘‘श्रीनीलकंठ’’ सूर्याच्या चरणकमलास नमस्कार करून शंकर नांवाच्या वडिलांच्या उपदेशावरून पातकाच्या शुद्धीस कारण असा निर्णय करतो. या ग्रंथांत धूर्तांनी कांही अधिक संग्रह केला आहे परंतु मी नंतर तो निर्मूल असल्यामुळें टाकून दिला. त्यामुळें पूजेंत आकाश पुष्प नसलेंतर तिला जसा कमीपणा येत नाहीं तसा यालाही कोणत्या प्रकारचा कमीपणा येणार नाही.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP