प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ९२ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘अथ पर्युषितशवदाहे गालवः’’ दिवा वा यदिवा रात्रौ शवस्तिष्ठति कर्हिचित्। तत्पर्युषितमित्याहुर्दहने तस्य का गतिः।
पंचगव्येन संस्नाप्य प्राजापत्यत्रयंचरेत्
पर्युंषित प्रेताच्या दहनाविषयी प्रायश्चित्त.
द्विजानें शूद्राच्या प्रेताच्या मागें गमन केलें तर त्या विषयीं विष्णु’’---जर द्विज शूद्राच्या प्रेताच्या मागें गमन करील, तर त्यानें नदी जवळ जाऊन तीत स्नान करून तीनदां अधमर्षण करावें. नंतर वर येऊन गायत्रीमंत्राचा एक हजार आठ जप करावा.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP