प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ७५ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘अपरार्के व्यासः’’ अथात्र चेद्भवेच्छंका सायं गौर्गोपने मृता। गोमूत्रेण तु संमिश्रं त्रिरात्रं यावकं पिबेदिति एतन्निषिद्धरज्जुबंधनपरं।
रज्जुविधिनिषेधो प्रागुक्तौ न नारिकेलैर्न च शाणवालैर्न वापि मौजेन न वज्रशृंखलैः। एतैस्तु गावोन निबंधनीया बध्वा तु तिष्ठेत्परशुं गृहीत्वा
निषिद्ध दोरानें गाय बांधून केली तर प्रायश्चित्त.
‘‘अपरार्कांत व्यास’’---रात्रीं गाईचें गोपन केलें असून ती जर मेली आणि त्याविषयीं मनांत शंका आली तर त्यानें गोमूत्रांत शिजवलेले जव तीन दिवसपर्यंत खावें. हे निषिद्ध दोराच्या बंधनाविषयीं जाणावें. दोराचा विधि व निषेध पूर्वी सांगितले. नारळांच्या दोरांनीं, सणाच्या दोरांनीं, मौंजांच्या दोरानें व बळकट सांखळदंडांनीं गाई बांधूं नयेत. जर बांधल्या तर (हातांत) फरश घेऊन उभे रहावें.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP