प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ८९ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘पराशरः’’ चांडालेन श्र्वपाकेन गोभिर्विप्रैर्हतोयदि। अहिताग्निर्हतोविप्रो विषेणापि हतोऽपि वा।
लौकिकाग्निना स दग्धव्यो मंत्रसंस्कारवर्जितः। स्प्रष्टा द्रष्टा च वोढा च सपिंडेषु च तस्य यः।
प्राजापत्यं चरेत्पश्र्चाद्विप्राणामनुशासनं। दग्ध्वास्थीनि पुनर्गृह्य क्षीरे प्रक्षालयेद्ब्रुधः। स्वाग्निभिश्र्च पुनर्दाहः स्वमंत्रेण पृथक् पृथक्।
एतच्च बुद्धिपूर्वक आत्महनने ‘‘प्रायोऽनाशकशस्त्राग्निविषोद्बंधनप्रपतनैश्र्चैच्छतामिति गौतमोक्तैः’’
चांडाळ वगैरेंनी अगिनहोत्री ब्राह्मणास मारलें तर त्याच्या क्रियेविषयी प्रायश्चित्त.
‘‘पराशर’’---चांडाळ, श्र्वपाक, गाई व ब्राह्मण यांनी जर अग्निहोत्री ब्राह्मणास (ठार) मारलें किंवा तो विषानें मेला तर त्याचें मंत्रसंस्कारावाचून लौकिकाग्नीनें दहन करावे. त्याच्या सपिंडांत त्याच्या प्रेतास स्पर्श करणारा, पहाणारा, प्रेत घेऊन जाणारा जो कोणी असेल, त्यानें प्राजापत्य प्रायश्चित्त करावें. नंतर (क्रिया करणार्या) ज्ञात्यानें ब्राह्मणांची आज्ञा घेऊन त्याच्या अस्थि जाळून दुधानें धुवाव्या. नंतर आपल्या मंत्रानें आपल्या अग्नीच्या योगानें पृथक् पृथक् त्यांचा दाह करावा. हें बुद्धिपूर्वक आत्मघाताविषयीं जाणावें. कारण, ‘‘महाप्रस्थान, उपास, शस्त्र, अग्नि, विष, टांगून घेणें व (पर्वतावरून) उडी घेणें त्यांच्या योगानें मरण्याची इच्छा करणारांस (हें प्रायश्चित्त)’’ असें गौतमाचें म्हणणें आहे.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP