प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ११६ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
क्षत्रियादिश्राद्धेभोजने तु तथैव’’ चांद्रायणं नवश्राद्धे पराकोमासिके स्मृतः। त्रैपक्षिके सांतपनं कृच्छ्रं मासद्वये स्मृतं।
क्षत्रियस्य नवश्रज्ञद्धे व्रतमेतदुदाहृतं। वैश्यस्यार्धाधिकं प्रोक्तं क्षत्रियात्तु मनीषिणः। शूद्रस्य तु नवश्राद्धे चरेच्चांद्रायणद्वयं।
सार्धचांद्रायणं मासि त्रिपक्षे त्वैंदवं स्मृतं। मासद्वये पराकः स्यादूर्ध्वं सांतपनं स्मृतमिति।
‘‘यत्तु हारीतः’’ एकादशाहे तु त्र्यहं भुक्त्वा संचयने तथा। उपोष्य विधिवद्भुक्त्वा कूष्मांडैर्जुहुयात् घृतं।
‘‘यदपि विष्णुः’’ प्राजापत्यं नवश्राद्धे पादोनं त्वाद्यमासिके। त्रैपक्षिके तदर्धं तु पंचगव्यं द्विमासिक इति तदुभयमापद्विषयम्।
क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांच्या श्राद्धांत ब्राह्मणानें भोजन केलें तर प्रायश्चित्त.
‘‘क्षत्रिय वगैरेंच्या श्राद्धीं भोजन केलें तर त्यांतच (षट्त्रिंशन्मतांत)’’ नवश्राद्धांत चांद्रायण, मासिकांत पराक, त्रैपक्षिकांत सांतपन व दुसर्या महिन्यांत कृच्छ्र सांगितलें. क्षत्रियाच्या नवश्राद्धांत हें (पूर्वीं सांगितलेलें) व्रत सांगितलें. वैश्याच्या नवश्राद्धांत ज्ञानी अशा क्षत्रियाच्या प्रायश्चित्तापेक्षां अर्ध्याहून अधिक प्रायश्चित्त सांगितले. शूद्राच्या नवश्राद्धांत दोन चांद्रायणें करावी. मासिकांत दीड चांद्रायण, त्रैपक्षिकांत चांद्रायण, दुसर्या महिन्यांत पराक आणि त्यापुढें सांतपन करावे. ‘‘जें तर हारीत’’ एकादशाहांत (एकोद्दिष्टांत), तसेंच संचयनांत भोजन केलें तर तीन दिवस विधीप्रमाणें उपवास करून कूष्मांडमंत्रांनीं तुपाचा होम करावा. आणि जें विष्णु’’ ‘‘नवश्राद्धांत प्राजापत्य, आद्यमासिकांत तीन चतुर्थांश (प्राजापत्याचा), त्रैपक्षिकांत अर्धें (प्राजापत्य) व दुसर्या मासिकांत पंचगव्य (पिणें) प्रायश्चित्त’’ असें म्हणतो तीं दोन्ही वचनें संकटाविषयीं जाणावी.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP