प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १४७ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘कामतः सुवर्णस्तेये तु याज्ञवल्क्यः’’ ब्राह्मणः स्वर्णहारी तु राज्ञे मुसलमर्पयेत्। स्वकर्मख्यापयंस्तेन हतोमुक्तोऽथवा शुचिः।
मुक्तः प्रहृतोऽपि जीवन्नत्प्रहतएवेत्यर्थः। अघ्नन्नेनस्वी राजेति गौतमेनाप्रहारे राज्ञोदोषोक्तेः। ततोमुसलमादाय सकृद्धन्यात्तु तं स्वयं। यदि जीवति सस्तेनस्ततस्तेयाद्विमुच्यत इति सांवर्ताच्च’’। एतेन स्तेनपोष्याणां बहूनां मृतिसंभावनायामप्रहृतोऽपि जीवन् शुद्ध इति माधवोक्तिरपास्ता मानाभावाच्च। ‘‘भविष्ये’’ महत्यपहृते पुत्र तथाल्पे च हृते गुह। हृतद्रव्यविशेषाद्वै स्वामिनस्तकरस्य च। प्रयोजनविशेषाच्च विशेषाद्देशकालयोः। अनुबंधविशेषाच्च प्रायश्चित्तं प्रकल्पयेत्। ‘‘तत्रैव’’ यद्यस्यापहृतं द्रव्यं तत्तस्यैव विनिर्दिशेत्।
प्रायश्चित्तं ततः कुर्यादेवं शुद्धिमवान्नुयात्। ‘‘विष्णुः’’ दत्वैवापहृतं द्रव्यं धनिकस्याभ्युपायतः। प्रायश्चित्तं ततः कुर्यात्कल्मषस्यापनुत्तये।
‘‘अत्र विशेषमाह मनुः’’ चरेत्सांतपनंकृच्छ्रं तन्निर्यात्यात्मशुध्दय इति तत् द्रव्यं निर्यात्य स्वामिने दत्वा शुद्धये प्रायश्चित्तयोग्यत्वार्थमित्यर्थः। ‘‘अत एव भविष्ये’’ तन्निर्यात्येतिवाक्यं तु प्रवदंति मनीषिणः तत्पूर्वं चैव योग्यस्येति भावप्रधानोनिर्देशः योग्यत्वस्येत्यर्थः। केचित्तु सुवर्णपरिमाणादूनं चोरितं धनं स्वामिने दत्वा स्वशुध्यदे सांतपनकृच्छ्रं कुर्यादिति मानवीयस्यार्थः तच्छद्बेन सुवर्णमितं पूर्वं ततोन्यूनं योग्यस्य शुद्धेः कारकमिति तु भविष्यस्यार्थ इत्याहुः।
सुवर्णस्तेये तु एकादशशांशाधिकं चोरितं धनं स्वामिने देयं ‘‘तथा च मिताक्षरायां’’ स्तेये ब्रह्मस्वभूतस्य सुवर्णादेः कृते पुनः। स्वामिनेपहृतं देयं हर्त्रा त्वेकादशाधिकं। ‘‘लघुविष्णुः’’ स्तेये ब्रह्मस्वभूते तु सुवर्णहरणे कृते। पश्र्चात्तेनैव दातव्यं तस्मै ह्येकादशाधिकं।
गुणसंशुद्धिभावाय ततश्र्चांद्रायणत्रयं। संवत्सरेण कर्तव्यं निपुणां शुद्धिमिच्छता। अभावे कांचनस्य स्याद्व्रतमेतच्चतुर्गुणं।
चरेद्यतात्मा निस्संगः पूर्णं वर्षचतुष्टयं। समाप्ते कांचनं गाश्र्च रजतं चापि शक्तितः। देयमन्नं द्विजोग्रेभ्यः शुभं पापोपशांतय इति गुणसंशुद्धिरात्म शुद्धिः। चांद्रायणत्रयमिति यवमध्यादीनि त्रीणि चांद्रायणवत्सरमभ्यसेदित्यर्थः। इदं च दोषप्रायश्चित्तादिकं रसवेधाद्यापादितसुवर्णसादृश्ये ताम्रादौ न भवति सुवर्णत्वजातिसमवायाभावात्
ब्राह्मणानें बुद्धिपूर्वक सोनें चोरलें तर शिक्षा साधारण द्रव्य चोरलें तर प्रायश्चित्त.
‘‘बुद्धिपूर्वक सोन्याच्या चोरी विषयीं तर याज्ञवल्क्य’’---सोनें चोरणार्या ब्राह्मणानें राजाजवळ जाऊन त्याला मुसळ देऊन आपले कर्म (चोरीची हकीकत) त्यास सांगावें नंतर राजानें त्या मुसळानें त्यास एकवार प्रहार करून तो मेला म्हणजे शुद्ध होईल. अथवा याप्रमाणें प्रहार करूनही जर तो वाचला तरीही तो शुद्ध होईल. प्रहार केल्या शिवाय तो जरी वाचला (राजानें त्यास सोडून दिले) तरीही शुद्ध होणार नाही. कारण, जो राजा प्रहार करणार नाहीं तो पापी होईल असा गौतमानें प्रहार न केला तर त्या विषयी राजास दोष सांगितला आहे. तसेंच ‘‘त्या जवळून मुसळ घेऊन राजानें स्वतां एकवार त्या मुसळाचा त्यास प्रहार करावा त्यांतून जर वाचला तर तो त्या चौर्या पासून मुक्त होईल’’ असें संवर्ताचें वचन आहे. ‘‘चोराकडून पोषण करण्यांत येणार्या पुष्कळांच्या मरणांचा संभव असल्यामुळें प्रहार केल्यावाचूनही वाचरणारा (चोर) शुद्ध होय ‘‘असें माधवाचें म्हणणें व्यर्थ होते. ‘‘भविष्यपुराणांत’’ हे पुत्रा षडानना ! पुष्कळ किंवा थोडे द्रव्य चोरलें असेल तर चोरलेल्या द्रव्याच्या विशेषावरून, मालक व चोर यांच्या प्रयोजनाच्या विशेषावरून, देश व काळ यांच्या विशेषावरून आणि अनुबंधाच्या विशेषा वरून प्रायश्चित्ताची कल्पना करावी. ‘‘त्यांतच’’ ज्याचें जें द्रव्य चोरलें असेल त्यास तें द्रव्य देऊन नंतर प्रायश्चित्त करावें म्हणजे तो शुद्ध होईल. ‘‘विष्णु’’--- ज्या धनिकाचें द्रव्य चोरलें असेल त्यास त्याचें द्रव्य खटपटीनें परत देऊन नंतर पाप दूर होण्याकरितां प्रायश्चित्त करावें. ‘‘मनु याविषयीं विशेष सांगतो’’---आपणास प्रायश्चित्ताची योग्यता यावी या साठी तें द्रव्य मालकास देऊन सांतपनकृच्छ्र करावे. ‘‘म्हणूनच भविष्यांत’’ तें द्रव्य मालकास द्यावे. असें ज्ञाते म्हणतात. तें प्रातिस्विक प्रायश्चित्ताच्या पूर्वीं योग्यतेचें सूचक आहे. यांत संशय नाही. ‘‘योग्यस्य’’ हा भावप्रधान निर्देश आहे, म्हणजे ‘‘योग्यत्वस्य’’ असा त्याचा अर्थ. कित्येक तर सोन्याच्या परिमाणा पेक्षां कमी चोरलेलें द्रव्य मालकास देऊन आपली शुद्धि होण्याकरितां सांतपन्कृच्छ्र करावें. असा मनूच्या वचनाचा अर्थ. तसेंच ‘‘तत्’’ शद्बावरून सुवर्णा एवढें. पूर्व म्हणजे त्यापेक्षां कमी. ‘‘योग्यस्य म्हणजे शुद्धीचें कारक असा भविष्याचा अर्थ असें म्हणतात.
सोन्याच्या चोरी विषयी तर चोरलेलें द्रव्य अकराव्या अंशानें अधिक असें मालकास द्यावें. ‘‘त्याप्रमाणेंच मिताक्षरेंत’’ ब्राह्मणाच्या मालकीच्या सोन्यादिकाची चोरी केली तर चोरी करणारानें मालकास तें द्रव्य अकराव्या अंशानें अधिक करून द्यावे. ‘‘लघुविष्णु’’---ब्राह्मणाची ज्यावर मालकी आहे असें सोनें चोरलें तर चोरणारानें त्याला तें सोनें अकराव्या अंशानें अधिक असें करून द्यावें. नंतर आपली शुद्धि होण्याकरितां एक वर्षपर्यंत यवमध्यादि तीन चांद्रायणें करावी. जर सोनें द्यावयास मिळालें नाहीं तर आपली चांगली शुद्धि व्हावी अशी इच्छा करणार्या त्या चोरानें चित्त स्वस्थ ठेवून कोणाशी संबंध न ठेवतां चार वर्षें पूर्ण होईपर्यंत हें व्रत (पूर्वीं सांगितलेलें) चौपट करावें. व्रताची समाप्ति झाल्यानंतर पापाची शुद्धि होण्याकरितां श्रेष्ठ ब्राह्मणांस शक्तीप्रमाणें सोनें, गाई किंवा रुपें द्यावें, तसेंच अन्नही द्यावें. हें दोषाचें प्रायश्चित्त वगैरे रसवेधादिकाच्या योगानें बनविलेल्या सोन्यासारख्या तांबें इत्यादि (धातूं) विषयीं होत नाही. कारण त्यांचा सोन्याच्या जातीशीं संबंध येत नाही.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP