अथ साधारणप्रायश्र्चित्तानि.
‘‘संवर्तः’’ हिरण्यदानं गोदानं भूमिदानं तथैव च। नाशयंत्याशु पापानि महापातकजान्यपि।
‘‘गौतमः’’ संवत्सरः षण्मासश्र्चत्वारस्त्रयोद्वावेकश्र्चतुर्विंशत्यहोद्वादशाहः षडहस्त्रयहोऽहोरात्र इतिकालाः एतान्यनादेशे विकल्पेन क्रियेरन् एनसि गुरुणि गुरुणि लघुनि लघूनि कृच्छ्रातिकृच्छ्रौ चांद्रायणमिति प्रायश्र्चित्तमिति।
‘‘विष्णुधर्मोत्तरे’’ सायं प्रातस्तथा कृत्वा वासुदेवस्य कीर्तनं। सर्वपापविनिर्मुक्तः स्वर्गलोके महीयते।
‘‘प्रभासखंडे श्रीभगवद्वाक्यं’’ नाम्नां मुख्यतरं नाम कृष्णाख्यं यत्परंतप। प्रायश्र्चित्तमशेषाणां पापानां मोचकं परं।
‘‘वाराहे’’ वासुदेवेति संकीर्त्य सुरापो व्याधितोऽपिवा। मुक्तोजायेत नियतं महाविष्णुः प्रसीदति।
गोविंदेति तथा प्रोक्ते भक्तया वा भक्तिवर्जितैः। दहने सर्पपापानि युगांतेग्निरिवोत्थितः।
‘‘विश्र्वामित्रः’’ कृच्छ्रचांद्रायणादीनि शुध्द्यभ्युदयकारणं। प्रकाशे च रहस्ये च अनुक्ते संशयेऽस्फुटे।
प्राजापत्यः सांतपनः शिशुकृच्छ्रः पराककः। अतिकृच्छ्रः पर्णकृच्छ्रः सौम्यकृच्छ्रोतिकृच्छ्रकः। महासांतपनः शुध्यै तप्तकृच्छ्रस्तु पावनः।
जपोपवासकृच्छ्रास्तु ब्रह्मकूर्चस्तु शोधकः। एते व्यस्ताः समास्तावा प्रत्येकं व्द्येकशोऽपिवा। पातकादिषु सर्वेषु उपवासेषु यत्नतः।
कार्याश्र्चांद्रायणैर्युक्ताः केवला वापि शुद्धये। शिशुचांद्रायणं प्रोक्तं यतिचांद्रायणं तथा। यवमध्यं तथा प्रोक्तं तथा पिपीलिकाकृति।
उपवासस्त्रिरात्रं वा मासः पक्षस्तदर्धकं। षडहोद्वादशाहादि कार्य शुद्धिफलार्थिना। उपपातकयुतानामनादिष्टेषु चैवहि।
प्रकाशे वाप्रकाशे वा अभिसंधाद्यपेक्षया। जातिशक्तिगुणान् दृष्ट्वा सकृब्दुधिकृतं तथा। अनुबंधादिकं दृष्टवा सर्वं कार्य यथाक्रमं।
प्रकाश उक्तं यत्किंचिद्विंशद्भागोरहस्यके। त्रिंशद्भागः षष्ठिभागः कल्प्यो जात्याद्यपेक्षया।
‘‘याज्ञवल्क्यः’’ अनादिष्टेषु पापेषु शुद्धिश्र्चांद्रायणेच च। धर्मार्थं च चरेदेतच्चंद्रस्येति सलोकतां।
‘‘षट्त्रिंशन्मते’’ त्रयाणां समुच्चयः प्रतिपादितः। यानिकानि च पापानि गुरोर्गुरुतराणि च।
कृच्छ्रातिकृच्छ्रचांद्रैस्तु शोध्यंते मनुरब्रवीत्। केवलप्राजापत्यस्य तु नैरपेक्ष्यं ‘‘चतुर्विंशतिमते’’ ऽभिहितं।
लघुदोषे त्वनादिष्टे प्राजापत्यं समाचरेदिति। ‘‘द्वयोः समुच्चयमाहोशनाः’’ दुरितानां दुरिष्टानां पापानां महतामपि।
कुच्छ्रं चांद्रायणं चैव सर्वपापप्रणाशनमिति दुरितमुपपातकं। दुरिष्टं पातकं।
मनुना तु पराकस्य नैरपेक्ष्यमुक्तं’’ पराको नाम कृच्छ्रोऽयं सर्वपापप्रणोदन इति।
‘‘गौतमोऽपि’’ प्रथमं चरित्वा शुचिः पूतः कर्मण्यो भवति द्वितीयं चरित्वा यदन्यन्महापातकेभ्यः पापं कुरुते तस्मात्पापात्प्रमुच्यते।
तृतीयं चरित्वा सर्वस्मादेनसोमुच्यत इति प्रथमादिपदैः कृच्छ्रोऽतिकृच्छ्रः कृच्छ्रतिकृच्छ्राश्र्चोच्यते।
‘‘हारीतः’’ चांद्रायणं पराकं च तुलापुरुष एव च। गवां चैवानुगमनं सर्वपापप्रणाशनं। ‘‘तथा’’ गोमूत्रं गोमयं क्षीरं सर्पिः कुशोदकं।
एकरात्रोपवासश्र्च श्र्वपाकमपि शोधयेत्। एतेषां सर्वेषां व्यवससेक्ता ‘‘विष्णुपुराणे’’ पापे गुरुणि गुरूणि स्वल्पान्यल्पे च तद्विदः।
प्रायश्र्चित्तानि मैत्रेय जगुः स्वायंभुवादयः। ‘‘भविष्ये’’ एवं विषयभेदेन व्यवस्थाप्यानि पुत्रक।
प्रायश्र्चित्तातनि स वर्णानि गुरूणि च लघूनि च। अन्यथा हि महाबाहो लघूनामुपदेशतः।
गुरूणामुपदेशोहि निष्प्रयोजनतां व्रजेत्। ‘‘गौतमः’’ एनसि गुरूणि गुरूणि लघुनि लघूनि।
एवमन्यान्यपि द्रष्टव्यानि इति साधारण प्रायश्र्चित्तानि.
साधारण प्रायश्र्चित्तें.
‘‘संवर्त’’---सोन्याचें दान, गाईचें दान तसेंच भूमीचें दान ही महापातकांपासून उत्पन्न झालेल्याही पातकांचा नाश करतात. ‘‘गौतम’’---एक वर्ष, सहा महिने, चार महिने, तीन महिने, दोन महिने, एक महिना, चोवीस दिवस, बारा दिवस, सहा दिवस, तीन दिवस व एक दिवस हे काल सांगितले. ज्या ठिकाणीं अमुक काल पावेंतों व्रत (कृच्छ्रादि) करावें असें सांगितलें नसेल त्या ठिकाणी वर सांगितलेल्या मुदतीपैकी (कालापैकी) मोठें पातक असतां मोठी, लहान पातक असतां लहान अशी एखादी मुदत घेऊन त्या मुदतीत कृच्छ्र, अतिकृच्छ्र व चांद्रायण यांतून एकादें प्रायश्र्चित्त (पातकाच्या धोरणाप्रमाणें) करावे. ‘‘विष्णुधर्मोत्तरांत’’ जो संध्याकाळी व सकाळी वासुदेवाचें नामस्मरण करील, तो सर्व पापांपासून मुक्त होऊन स्वर्गलोकांत पूज्य होतो. ‘‘प्रभासखंडांत भगवंताचें वाक्य’’ हें धर्मराजा ! सर्व नांवां मध्ये श्रेष्ठ असें कृष्ण हें नांव सर्व पातकांपासून सोडविणारें प्रायश्र्चित्त आहे. ‘‘वराहपुराणांत’’ ‘‘वासुदेव’’ असें जो उच्चारण करील तो दारू पिणारा असो अथवा व्याधीनें पीडित असो तो मुक्त होईल, व त्या योगानें विष्णु प्रसन्न होतो. भक्तीनें किंवा भक्तीवाचून ‘‘गोविंद’’ असा उच्चार केला असतां तो प्रळय काळांत उत्पन्न झालेल्या अग्नी प्रमाणें सर्व पापें जाळून टाकतो.
‘‘विश्वामित्र’’---स्पष्ट, रहस्य, न सांगितलेलें, संशयित व अस्पष्ट अशा पातकांत कृच्छ्र चांद्रायण वगैरे ही शुद्धि व अभ्युदय (उत्कर्ष) यांस कारण आहेत. प्राजापत्य, सांतपन, शिशुकृच्छ्र, पराक, अतिकृच्छ्र, पर्णकृच्छ्र, सौम्यकृच्छ्र, अतिकृच्छ्र, महासांतपन, पावन असा तप्तकृच्छ्र, जप, उपास, कृच्छ्र व ब्रह्मकूर्च हे निरनिराळे किंवा सगळे करावे, किंवा यांपैकी एकेक, दोन दोन, करावे. हे पूर्वीं सांगितलेले सर्व पातकांच्या ठिकाणीं, उपासांच्या ठिकाणीं किंवा शुद्धि करितां चांद्रायणासह करावे किंवा त्या वाचून करावे. शिशुचांद्रायण, यतिचांद्रायण हीं शुद्धिच्या फळाची इच्छा करणारानें करावी. तसेंच तीन रात्र, महिना, पंधरा दिवस, सहा दिवस किंवा बारा इत्यादि दिवस पावेंतों उपवास करावा. उपपातकांनीं युक्त असतील त्यांनीं, तसेंच जेथे प्रायश्र्चित्त सांगितलें नसेल त्या पातकांत, उघड घडलेल्या पातकांत, रहस्य (उघड न घडलेल्या) पातकांत उत्कर्षादिकाच्या हेतूनें (कर्त्याची) जात, शक्ति गुण हे पाहून तसेंच जाणून केलेलें किंवा न जाणतां केलेलें हें पाहून तसेंच अनुबंधादिक जाणून पूर्वी सांगितलेलें सर्व (प्राजापत्यादि) क्रमानें करावे. उघड घडलेल्या पातकांत जें कांहीं प्रायश्र्चित्त सांगितलें असेल त्याचा जाति वगैरे यांची जरूर पडेल त्याप्रमाणें रहस्यांत (एकांत घडलेल्या पातकांत) विसावा, तिसावा किंवा साठावा भाग योजावा. ‘‘याज्ञवल्क्य’’---जीं पातकें सांगण्यांत आली नाहींत त्यांच्या ठिकाणी चांद्रायणानें शुद्धि होते. तसेंच धर्माची प्राप्ति होण्याकरितां हें चांद्रायण करावें म्हणजे त्या योगानें चंद्राच्या लोकाची प्राप्ति होते.
‘‘षट्त्रिंशन्मतांत’’ तीन कृच्छ्रांचा समुदाय सांगितला. जी कोणतीही मोठ्यांहून मोठी पातकें असतील तीं कृच्छ्र, अतिकृच्छ्र व चांद्रायण यांच्या योगानें शोधिली जातात असें ‘‘मनूनें’’ सांगितले. ‘‘चतुर्विशतिमतांत प्राजापत्याचेंच महत्व सांगितलें’’---जेथें लहान पातक सांगितलें नसेल तेथें प्राजापत्य करावे. ‘‘उशनसानें दोघांचा समुदाय सांगितला’’---उपपातकें, पातकें व महापापें यांची शुद्धि होण्याकरितां सर्व पापांचा नाश करणारें कृच्छ्र व चांद्रायण हीं दोन व्रतें करावी. ‘‘मनूनें पराकाचेंच महत्व सांगितले’’---पराक या नांवाचा कृच्छ्र सर्व पापांचा नाश करणारा आहे. ‘‘गौतम ही’’---कृच्छ्राचें आचरण केल्या पासून शुद्ध, पवित्र व कर्म करण्यास योग्य होतो. अतिकृच्छ्राचें आचरण केल्यानें महापातकांहून जें दुसरें पातक करण्यांत येतें त्यापासून मुक्त होईल. कृच्छ्रातिकृच्छ्राचें आचरण केल्यानें सर्व पापांपासून मुक्त होतो. ‘‘हारीत’’---चांद्रायण, पराक, तुलापुरुष व गायीची सेवा करणें ही सर्व पापांचा नाश करणारी आहेत. ‘‘तसेंच’’ गोमूत्र, शेण, दुध, दहि, तूप व कुशोदक हें (पंचगव्य) व एक दिवसाचा उपवास हे चांडाळाचीही शुद्धि करतील. ह्या सर्वांची व्यवस्था ‘‘विष्णुपुराणांत सांगितली आहे’’---हे मैत्रेया ! धर्मशास्त्र जाणणार्या स्वायंभुवादिकांनीं मोठ्या पातकांत मोठी, लहान पातकांत लहान अशी प्रायश्र्चित्तें सांगितली, ‘‘भविष्यपुराणांत’’ हे पुत्रा ! याप्रमाणें विषयाच्या भेदानें मोठी व लहान अशा सर्व पातकांची व्यवस्था करावी. हे ‘‘महाबाहो! असें न केले तर लहानांच्या (पातकांच्या) उपदेशावरून मोठ्या (पातकां) चा उपदेश घेतला असतां तो निष्प्रयोजन होईल. ‘‘गोतम’’---मोठ्या पातकांत मोठी, लहान पातकांत लहान प्रायश्र्चित्तें करावी. या प्रमाणें दुसरी ही जाणावी.
याप्रमाणें साधारण प्रायश्र्चित्तें सांगितली.