मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त ३६ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ३६ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

अथ सांतपनं.

‘‘शंखः’’ गोमूत्रं गोमयं क्षीरं दधि सर्पिः कुशोदकं। एकरात्रोपवासश्र्च कृच्छ्रं सांतपनं स्‍मृतं। एतदेव त्र्यहाभ्‍सस्‍तं यतिसांतपनं स्‍मृतं।
महासांतपनमाह ‘‘याज्ञवल्‍क्‍यः’’ पृथक्‌ सांतपनद्रव्यैः षडहः सोपवासकः। सप्ताहेन तु कृच्छ्रोऽयं महासांतपनः स्‍मृतः ‘‘यमः’’ एतान्येव च पेयानि एकैकं च व्द्यहं व्द्यहं। अति सांतपनं नाम श्र्वपाकमपि शोधयेत्‌। द्वादशाहोऽयं। ‘‘त्र्यहंपिबेत्तु गोमूत्रं त्र्यहं क्षीरं त्र्यहं सर्पिस्‍ततः शुचिः पंचदशाहोऽयं। ‘‘जाबालः’’ एकैक मेंतदेवं हि त्रिरात्रमुपयोजयेत्‌। त्र्यहं चोपवसेदंत्‍यं महासांतपनं विदुरिति एकविंशरात्रोऽयम्‌।

सांतपन

कृच्छ्र सांतपन, महासांतपन, यतिसांतपन, व अतिसांतपन यांचे लक्षणे.

‘‘शंख’’---पहिलया दिवशी गोमूत्र, शेण, दुध, दहि, तूप व दर्भांनी मिश्र केलेलें पाणीही एकत्र करून प्यावी, दुसर्‍या दिवशी उपास करावा याला ‘‘सांतपन कृच्छ्र’’ म्‍हटलें आहे. हेंच तीन दिवस पिऊन चवथ्‍या दिवशीं उपास करणें त्‍याला ‘यतिसांतपन’ म्‍हटलें आहे. ‘‘याज्ञवल्‍क्‍य’’ महासांतपन सांगतो---सांतपनांत सांगितलेल्‍या गोमूत्र, शेण वगैरे सहा द्रव्यांपैकी प्रत्‍येक दिवशी निरनिराळे द्रव्य घ्‍यावे. (प्यावें). जसें पहिल्‍या दिवशी गोमूत्र, दुसर्‍या दिवशी शेण इ. याप्रमाणें सहा दिवस करून सातव्या दिवशी उपास करावा. याला ‘‘महासांतपन’’ कृच्छ्र असें म्‍हटलें आहे. ‘‘यम’’---पूर्वी सांगितलेल्‍या गोमूत्र इत्‍यादि सहा पदार्थांपैकी प्रत्‍येक पदार्थ दोन दोन दिवस प्यावा याला ‘‘अतिसांतपन’’ म्‍हणतात. हा चांडाळाचीही शुद्धि करील हा बारा दिवसांचा आहे. तीन दिवस गोमूत्र, तीन दिवस शेण, तीन दिवस दहि, तीन दिवस दुध, व तीन दिवस तूप प्यावें म्‍हणजे शुद्धि होईल. याला ‘‘महासांतपन’’ म्‍हटलें आहे. ‘‘जाबाल’’---ह्या सहा पदार्थांपैकी प्रत्‍येक पदार्थ क्रमानें तीन तीन दिवस प्यावा आणि शेवटी (१९ दिवसापासून) तीन दिवस उपास करावा, याला ‘‘महासांतपन’’ म्‍हणतात. हा एकवीस दिवसांचा आहे.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP