प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ११८ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘अथ संस्कारन्नभोजने प्रायश्चित्तविवेकेंऽगिराः’’ जन्म प्रभृतिसंस्कारे बालस्यान्नस्य भोजने।
असपिंडैर्न भोक्तव्यं स्मशानांते विशेषतः। ‘‘व्यासः’’ निवृत्ते व्रतहोमे तु प्राङ्नामकरणात्तथा। चरेत्सांतपनं भुक्त्वा जातकर्मणि चैवहि।
अतोऽन्येषु तु भुक्त्वान्नं संस्कारे तु द्विजोत्तमः। नियोगादुपवासेन शुध्यते निंद्यभोजने।
‘‘धौम्यः’’ ब्रह्मोदने च सोमे च सीमंतोन्नयने तथा। जातश्राद्धे नवश्राद्धे द्विजश्र्चांद्रायणं चरेत्।
‘‘आपस्तंबः’’ याजकान्नं नवश्राद्धं संग्रहे चैव भोजनम्। स्त्रीणां प्रथमगर्भे च द्विजश्र्चांद्रायणं चरेदिति स्त्रीणां संग्रहोविवाहः
जातकर्मादि संस्कारांत असपिंडांनीं भोजन केलें तर प्रायश्चित्त.
‘‘संस्काराच्या अन्नाच्या भोजनाविषयी प्रायश्चित्त विवेकांत अंगिरस्’’--- मुलाच्या जन्मापासून (होणार्या) संस्कारांतील अन्नाचें भोजन असपिंडांनीं करूं नये. तसेंच विशेषें करून अंत्यसंस्काराचेंही अन्न खाऊं नये. ‘‘व्यास’’---मुंजीचा होम झाल्यानंतर, तसेंच नाम करणाच्या पूर्वीं व जातकर्मसंस्कारांत उत्तम ब्राह्मणानें भोजन केलें तर सांतपन करावे. याशिवाय दुसर्या संस्कारांत भोजन केलें तर निंद्य अशा अन्नाचें भोजन केलें तर उपास केल्यानें निश्र्चयानें शुद्धि होईल. ‘‘धौम्य’’---द्विजानें ब्रह्मोदन, सोम, सीमंतोन्नयन, नांदोश्राद्ध व नवश्राद्ध यांत भोजन केलें तर चांद्रायण करावे. ‘‘आपस्तंब’’---द्विजानें याजकाचें अन्न, नवश्राद्ध, विवाह व प्रथमगर्भ या संबंधी अन्न खाल्लें तर चांद्रायण करावे.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP