प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १३९ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘संवर्तः’’ शूद्राणां भाजने भुक्त्वा भुक्त्वा वा भिन्नभाजने। अहोरात्रोषितो भूत्वा पंचगव्येन शुध्यति।
‘‘भिन्नपवाद माह देवलः’’ ताम्ररजतसुवर्णाश्मशंखशुक्तिस्फटिकानां भिन्न मभिन्नमिति।
भिन्नभाजनं कांस्यं भिन्नकांस्ये तु योश्र्नीयान्नपां स्नात्वा जपेद्विजः।
गायत्र्यष्टसहस्रं तु एकभक्तस्तदा शुचिरिति ‘‘बौधायनोक्तेः’’ एतच्च ज्ञानतः ‘‘अज्ञानतस्तु पराशरः’’ ‘‘भिन्नभांडे तु भुंजानो ह्यज्ञानेन द्विजोत्तमः। सुवर्णोदक संस्पृष्टघृतं प्राश्य विशुध्यति। मिताक्षरायां स्मृत्यंतरे’’ वटार्काश्र्वत्थपत्रेषु कुंभीतिदुंकपत्रयोः।
कोविदारकदंबेषु भुक्त्वाचांद्रायणं चरेत्। तथा। पलाशपद्मपत्रेषु गृही भुक्त्वैं दवं चरेत्। वानप्रस्थो यतिश्र्चैव लभते चांद्रकं फलं।
पलाशोवल्लीपलाश इति स्मृत्यर्थसारे हेमाद्रौच
शूद्राच्या भांड्यांत किंवा भिन्न पात्रांत भोजन केलें तर प्रायश्चित्त. त्याचा अपवाद दुसरीं निषिद्धपात्रें.
‘‘संवर्त’’---जर द्विज शूद्रांच्या भांड्यांत किंवा भिन्न पात्रांत भोजन करील, तर त्यानें एक दिवस उपास करून पंचगव्य प्यावें म्हणजे तो शुद्ध होईल. ‘‘देवल भिन्नाचा अपवाद सांगतो’’ तांबें, रुपें, सोनें, दगड, शंख, शिंप व स्फटिक यांचे भिन्न (फुटकें) पात्र जरी असलें तरी तें अभिन्न होय. भिन्न भाजन (पात्र) काशाचें होय. कारण, ‘‘भिन्न (फुटक्या) अशा कांशाच्या भांड्यांत जो द्विज भोजन करील, त्यानें पाण्यानें स्नान करून शुचिर्भूत होत्सता एक वेळ भोजन करून आठ हजार गायत्रीमंत्राचा जप करावा. अशी ‘‘बौधायनाची उक्ति आहे’’ हें बुद्धिपूर्वकाविषयीं जाणावें. ‘‘अबुद्धिपूर्वकाविषयीं तर पराशर’’---जो द्विजश्रेष्ठ अज्ञानानें भिन्न पात्रांत भोजन करील, त्यानें सुवर्णयुक्त अशा उदकानें स्पर्शित केलेलें तूप प्यावें म्हणजे तो शुद्ध होईल. ‘‘मिताक्षरेंत दुसर्या स्मृतींत’’ वड, रुई, पिंपळ, कुंभी, तिंदुक, कोविदार व कदंब यांच्या पानांवर जो जेवील त्यानें चांद्रायण करावें. ‘‘तसेंच’’ पळस व कमळें यांच्या पानांवर जो गृहस्थश्रमी भोजन करील, त्यानें चांद्रायण करावें. वानप्रस्थ व संन्यासी जर यांच्यावर भोजन करतील तर त्यांस चांद्रायणाचें फळ मिळेल. पळस म्हणजी वल्लीपळस असें स्मृत्यर्थसारांत व हेमाद्रींत आहे.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP