प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १२९ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘शूद्रोदकपाने शातातपः’’ यदि विप्रः प्रमादेन शूद्रतोयं पिबेत्स्वयमित्युपक्रम्य। उपोष्य विल्वपद्मानां पलाशस्य कुशस्य च।
एतेषामुदकं पीत्वा तेन शुद्धिमवाप्नुयात्। ‘‘अपवादमाह जाबालिः’’ नवभांडें तु पानीयं शूद्रविट्क्षेत्रजन्मनां।
पेयं तदपि विप्राणां पयोदधि तथैव च। ‘‘शंखः’’ घृतदधिपयस्तक्राणामाकरभांडस्थितानामदोष इति ‘‘शातातपः’’ घृतं तैलं दधि क्षीरं तथैवेक्षुरसोगुडः। शूद्रभ्ज्ञांडस्थितं तक्रं तथा मधु न दुष्यति
जर ब्राह्मण शूद्राचें उदक पिईल तर प्रायश्चित्त. त्याचा अपवाद.
‘‘शूद्राच्या उदकाच्या पानाविषयी शातातप’’ जर ब्राह्मण अज्ञानानें शूद्राचें पाणी स्वतः पिईल’’ असा उपक्रम करून ‘त्यानें उपोषण करून बेलाचीं पाने, कमळें, पळस व दर्भ यांचें उदक करून प्यावें म्हणजे त्या योगानें त्याची शुद्धि होईल असें सांगतो. जाबाल अपवाद सांगतो’’---शूद्र, वैश्य व क्षत्रिय यांच्या नव्या भांड्यांतील पाणी ब्राह्मणांस पिण्यास योग्य आहे. तसेंच दुध व दहिही आहे. ‘‘शंख’’---भट्टींतून नवीन काढलेल्या भांड्यांत असलेल्या तूप, दहि, दुध व ताक यांस दोष नाहीं. ‘‘शातातप’’---तूप, तेल, दहि, दुध, उसाचा रस, गुळ, ताक व मध हीं शूद्राचें भांड्यांत जरीं असलीं तरी त्यांस दोष नाहीं.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP