प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ३ रे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
इदं चं प्रायश्चित्तं निमित्ते विधानान्नैमित्तिकं पापनाशकतया काम्यं च।
‘‘अत एव बृहस्पतिः’’ प्रायश्चित्तं यत्क्रियते तन्नैमित्तिक
मुच्यते इति ‘‘जाबालः’’ अतःकाम्यं नैमित्तिकं च प्रायश्चित्तमिति स्थितिरिति
प्रायश्चित्ताचे काम्य व नैमित्तिक असे दोन भेद.
हे प्रायश्चित्त कारण प्राप्त झालें असतां करण्यांत येते म्हणून नैमित्तिक व पापाचा नाश करणारें आहे म्हणून काम्य आहे. म्हणूनच ‘‘बृहस्पति’’ - जे प्रायश्चित्त करण्यांत येते तें नैमित्तिक म्हटलें आहे. म्हणूनच काम्य व नैमित्तिक असे प्रायश्चित्ताचे दोन भेद मानले आहेत असें ‘जाबाल’ म्हणतो.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP