प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ८४ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘याज्ञवल्क्यः’’ किंचित्सास्थिवधे देयं प्राणायामस्त्वनस्थिक इति किंचिदष्टमुष्टि धान्यं।
‘‘मनुः’’ अस्थन्वतां तु सत्वातां सहस्रस्य प्रमापेण। पूर्णे वानस्यनस्न्थां तु शुद्रहत्त्याव्रतं चरेदिति शूद्रहत्त्याव्रतं षाण्मासिकं
हाडानें युक्त असणार्या सरडा इत्यादि प्राण्यांचा व हाड नसणार्या प्राण्यांचा वध केला तर प्रायश्चित्त.
‘‘याज्ञवल्क्य’’---हाडानें युक्त असणार्या एक हजारांपेक्षा कमी अशा सरडा वगैरे प्राण्यांचा वध केला असतां थोडें धान्य म्हणजे आठ मुठी एवढें, किंवा थोडें सोनें द्यावें. ज्यांच्या शरीरांत हाड नाहीं अशांचा वध केला तर एक प्राणायाम करावा. ‘‘मनु’’---हाड असणार्या अशा हजार प्राण्यांचा वध केला असतां आणि हाड नसणार्या अशा एक गाडें भरेल एवढ्या प्राण्यांचा वध केला असतां सहा महिन्यांचें शूद्राच्या हत्त्येचें प्रायश्चित्त करावें.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP