मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त २१ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त २१ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

अथ प्रायश्चित्तातिदेशः

स त्रिविधः। वाचनिकातिदेशस्‍ताद्रूप्यातिदेशः साम्‍यातिदेशश्र्चेति।
तत्र वाचनिकं तावत्तमाह ‘‘याज्ञवाल्‍क्‍यः’’ यागस्‍थक्षत्रविट्‌घाती चरेद्ब्रह्मणि व्रतं।
‘‘ताद्रूप्यातिदेशमप्याह स एव’’ पितुः स्‍वसारं मातुश्र्च मातुलानीं स्‍नुषामपि।
मातुःसपत्‍नीं भगिनीमाचार्यतनयां तथा।
आचार्यपत्‍नीं स्‍वसुतां गच्छंस्‍तु गुरुतल्‍पग इति।
‘‘साम्‍यातिदेशमप्याह स एव’’ गुरूणामध्यधिक्षेपो वेदनिंदासुहृद्वघः।
ब्रह्महत्त्यासमं ज्ञेयमधीतस्‍य च नाशनमिति अत्र साम्‍यातिदेशेऽर्घं ताद्रूप्यवाचनिकयोस्‍तु पादोनं राजसमोमंत्रीत्‍यादौ किंचिद्धीत एव समपदप्रयोगत्‌।
महापातकातिदेशविषयाणां च पातकसंज्ञकत्‍वात्‌।
‘‘महापातकतुल्‍यानि पापान्युक्तानि यानि तु। तानि पातकसंज्ञानि तन्न्यूनमुपपातकमिति’’ पातकानांमहापापान्नयूत्‍वप्रतिपादनाच्चेति ‘‘विज्ञानेश्र्वरादयः’’ अत्र ‘‘केचित्‌’’ इषावेकाहे समानमितरेष्‍वनेनेति वाचनिकातिदेशे न्यूनत्‍वाप्रतीतेरिहापिन न्यूनतेति।
राजसमो मंत्रीत्‍यादौ तु न्यूनता प्रत्‍यक्षगम्‍या। अस्‍तु वा समशद्बेन न्यूनताप्रतीतिकलहः।
पादोनार्धादीयत्ता तु निष्‍प्रमाणिकेति। ‘‘अत्रास्‍मज्‍जयेष्‍ठभ्रातृचरणाः’’ महापातकतुल्‍येषु पातसंज्ञेषु विशेषतः प्रायश्चित्तानुक्तेस्‍तदाकांक्षायामर्थवादे महापापजन्यनरकार्धावगतेः प्रायश्चित्तेऽप्यर्धता कल्‍प्‍यते।
‘‘तमेवार्थवादमाहांगिराः’’ पातके तु सहस्त्रं स्‍यान्महत्‍सु द्विगुणं तथा।
उपपापे तुरीयं स्‍यान्नरकं वर्षसंख्ययेति।
‘‘यत्तु विष्‍णुः’’ अतिपातकिनः पर्यायेण पच्यंते कल्‍पं। मन्वतरं महापातकिनः।
अनुपातकिनश्र्चोपपातकिनश्र्चतुर्युगमिति तदभ्‍यासपरं।
अनुपातकं महापातकतुल्‍यं पातकसंज्ञं। ताद्रूप्यवाचनिकातिदेशे तु पादोनमेव।
ब्राह्मणीपुत्रस्‍य क्षत्रियायां मातरि गमने पादहान्या द्वादशवार्षिकमेवमन्यवर्णास्‍विति ‘‘मिताक्षरोक्तस्‍मृत्‍या’’ पादोनं द्वादशाद्बमुक्तं।
तच्च न केवलं हीनवर्णमातृगगमन एव किंतु मातुः सपत्‍नीमित्‍याद्युक्तसर्वताद्रूप्यवाचनिकातिदेशविषयं। सर्वेषां समानधर्मत्‍वात्‌।
‘‘यथाहोशनाः’’ बहूनामेकधर्माणामेकस्‍यापि यदुच्यते। सर्वेषां तद्भवेत्‍कार्यमेकरूपा हि ते स्‍मृता इति।
अत एव ‘‘मिताक्षरायां’’ रजक्‍यादीनां पंचानां गमने चांद्रायणद्वयं प्रायश्चित्तमापस्‍तंबोक्तमुक्‍त्‍वा ‘‘रजकश्र्चर्मकश्र्चैव नटो बुरुड एव च।
कैवर्तभेदभिल्‍लाश्र्च सप्तैते अंत्‍यजाः स्‍मृता इति’’सप्तांत्‍यजस्त्रीगमनेऽपि तदेव प्रायश्चित्तमुशनोवाक्‍य बलादुक्तमिति युक्तमुत्‍पश्यंति।
एतेनातिदेशे संपूर्ण प्रायश्चित्तं वदंतौ शूलपाणिभवदेवा वप्यपास्‍तौ।
किंच सर्वत्र द्वादशाद्विविधित्‍सायां स्‍मृतिषु तदुपदेश एव स्‍यात्‌। न तु क्वचिदुपदेशः क्वचिच्चातिदेश इति निष्‍प्रयोजनं द्वैविध्यं।
न चात्र न्यूनतातिरिक्तं ‘‘सौर्यादिष्‍विव दर्शपूर्णमासिकातिदेशस्‍योहादिप्रयोजनमस्‍ति।
यच्च ‘‘भवदेवः’’ साम्‍योक्तिरर्थवादः। अन्यथा ब्रह्महत्त्यासुरापानसमेषु मिथ्‍योत्‍कर्षोक्तिवेदनिंदादिष्‍वपि द्वादशाद्बं स्‍यात्‌।
क्वचितत्तद्विशेषे मनुष्‍यहरणे ‘‘मनुना’’ चांद्रायणादिस्‍वल्‍पप्रायश्चित्तांतराम्‍नाच्चेति तदपि न।
मिथ्‍योत्‍कर्षोक्तिवेदनिंदादिषु द्वादशाद्बाद्यपेक्षयार्धस्‍येष्‍टत्‍वान्मनूक्ताल्‍पप्रायश्चित्तस्‍य नीचमनुष्‍यापहारपरत्‍वाच्च

इत्‍यतिदेशः
प्रायश्चित्ताचा अतिदेश.
वाचनिक, ताद्रूप्य व साम्‍य असे तीन प्रकारचे अतिदेश
तो तीन प्रकारचा. वाचनिकातिदेश, ताद्रूप्यातिदेश व साम्‍यातिदेश याप्रमाणें. त्‍यांत पूर्वी ‘‘याज्ञवल्‍क्‍य’’ वाचनिक (अतिदेश) सांगतो-यज्ञांत असलेला क्षत्रिय व वैश्य यांचा घात करणारानें ब्रह्महत्‍येंत जें व्रत (प्रायश्चित्त) करावयाचें तें करावें. ‘‘तोच’’ ताद्रूप्यातिदेशही सांगतो-बापाची बहीण (आते), आईची बहीण (मावशी), मामी, सून, आईची सावत्र बहीण, आचार्याची मुलगी व आपली मुलगी यांशी गमन करणारा गुरुतल्‍पग होतो. साम्‍यातिदेशही ‘‘तोच’’ सांगतो-वडिलांचा अपमान करणें, वेदाची निंदा करणें, स्‍नेह्याचा नाश करणें, व वेद वगैरे शिकलेले विसरून जाणें हें ब्रह्महत्त्येचे प्रमाणें होते.

साम्‍य, ताद्रूप्य व वाचनिक या तीन अतिदेशांत प्रायश्चित्ताचा निर्णय.
येथें साम्‍यातिदेशांत अर्धें प्रायश्चित्त, ताद्रूप्य व वाचनिक या दोघांत तीन चतुर्थांश. कारण ‘‘राजसमो मंत्री’’ (राजासारखा मंत्री) इत्‍यादि ठिकाणी किंचित्‌ कमीपणांतच समपदाचा प्रयोग आहे, आणि महापातकांच्या अतिदेशांत असलेल्‍यांस पातक संज्ञा आहे, तसेंच ‘‘महापातकां सारखीं जीं पातकें सांगितली ती पातक संज्ञक होत, त्‍यांहून कमी असणारें तें उपपातक होय.’’ या वचनावरून पातकांस महापातका पेक्षां न्यूनत्‍व (कमीपणा) सांगितलें असें ‘‘विज्ञानेश्र्वर वगैरे’’ म्‍हणतात. याविषयी ‘‘कित्‍येक’’ ‘‘इषावेकाहे समान मितरेष्‍वनेन’’ या ठिकाणीं वाचनिकअतिदेशांत कमीपणाची प्रतीति (प्रसिद्धि) होत नसल्‍यांवरून येथेंही न्यूनता नाहीं असें म्‍हणतात. ‘‘राजसमो मंत्री’’ इत्‍यादि ठिकाणी तर न्यूनता प्रत्‍यक्ष समजण्यासारखी आहे. अथवा ‘‘सम’’ शब्‍दावरून न्यूनतेच्या प्रतीतीचा तंटा बाजूस राहो. तीन चतुर्थांश, अर्धें इत्‍यादि ईयत्ता तर निष्‍प्रमाण आहे.

वाचनिकादि अतिदेशांच्या प्रायश्चित्ताबद्दल मयूखकारांच्या वडील भावाचा अभिप्राय.
याविषयी आमचे ‘‘वडील भाऊ’’ महापातकां सारख्या पातकांची प्रायश्चित्तें सांगण्यांत आली नाहीत म्‍हणून ती समजण्याची इच्छा झाल्‍यानें अर्थवादावरून महापातकांपासून होणार्‍या नरकाच्या निंमपटीचें ज्ञान झाल्‍यावरून (पातकाच्या) प्रायश्चित्तांतही निंमपटीची कल्‍पना करण्यांत आली. ‘‘अंगिरस्‌’’ तोच अर्थवार सांगतो-पातकांत हजार वर्षें पर्यंत नरकांत वास होतो, महापातकांत दुप्पट (दोन हजार) आणि उपपातकांत चतुर्थांश (अडीचशें) वर्षें पर्यंत नरकांत वास होतो. जें तर ‘‘विष्‍णु’’-‘‘अतिपातकी कल्‍पपर्यंत पर्यायानें नरकांत पचतात. महापातकी मन्वंतरा पर्यंत आणि अनुपातकी व उपपातकी चार युगेंपर्यंत नरकांत पचतात’’ असें सांगतो तें अभ्‍यासाविषयी आहे. अनुपातक म्‍हणजे महापातकासारखें जें पातक या नांवाचें तें. ताद्रुप्यवाचनिकातिदेशांत तर चतुर्थांशच प्रायश्चित्त. ‘‘ब्राह्मणीच्या मुलास क्षत्रिय मातेचे ठिकाणी गमन घडले तर चतुर्थीशानें कमी असे द्वादशाद्व (नऊ वर्षांचें) प्रायश्चित्त. याप्रमाणें दुसर्‍या वर्णांच्या मातांतविषयी समजावें’’ असें ‘‘मिताक्ष्रेंत’’ सांगितलेल्‍या स्‍मृतीवरून चतुर्थांशानें कमी असें बारा वर्षांचे (नऊ वर्षांचें) प्रायश्चित्त सांगितलें. तें प्रायश्चित्त कमी वर्णाच्या मातेशी गमन घडलें असतां त्‍याविषयीं आहे असें नाहीं तर ‘‘मातुः सपत्‍नी’’ इत्‍यादि सांगितलेला जो सर्व ताद्रूप्यावाचनिकातिदेश त्‍याविषयींही आहे. कारण सर्वांचा धर्म सारखा आहे. याप्रमाणें ‘‘उशनस्‌’’ सांगतो तें असें-एक ज्‍यांचा धर्म आहे अशा पुष्‍कळांतून एकाला जें सांगितलें असेल तेच सर्वांनीं करावयाचें, कारण ते सर्व एकच स्‍वरूपाचे सांगितले. म्‍हणूनच ‘‘मित्राक्षरेंत’’ परीटीण इत्‍यादि पांचांशीं गमन केले तर ‘‘आपस्‍तंबानें’’ सांगितलेलें दोन चांद्रायणें प्रायश्चित्त सांगून ‘‘परीट, चांभार, नट, बुरूड, कोळी, मांग व भिल्‍ल हे सात अंत्‍यज सांगितले.’’ या सात अंत्‍यजांच्या स्त्रीयांशी गमन केले असतांही तेंच (दोन चंद्रायण) प्रायश्चित्त उशनासाच्या वचनाच्या बळावरून सांगितलें असें योग्‍य ठरवितात.
यावरून अतिदेशांत संपूर्ण प्रायश्चित्त सांगणारे शूलपाणि आणि भवदेव यांचें म्‍हणणें रद्द होते. आणखी द्वादशाद्बाचा विधि करण्याची आकांक्षा असतां सर्व स्‍मृतींत त्‍याचा उपदेशच असणार. एखादे ठिकाणीं त्‍याचा उपदेश व एखाद्या ठिकाणीं त्‍याचा अतिदेश असे निष्‍कारण दोन प्रकार कधीही असूं शकणार नाहींत. तसेंच ज्‍याप्रमाणें सौर्यादिकांमध्ये दर्शपूर्णमासाच्या अतिदेशास ऊहादिकाचें प्रयोजन असतें त्‍याप्रमाणें येथेंही कमीजास्‍तीपणा आहे असें नाही. तसेंच जें ‘‘भवदेव’’ ‘‘साम्‍योक्ति’’ हा अर्थवाद आहे. कारण असें जर नाही तर ब्रह्महत्‍या व सुरापान (दारू पिणें) यांशी समान असणार्‍या खोटीच बडाई मारणें, वेदाची निंदा वगैरेंच्या ठिकाणींही द्वादशाद्ब प्रायश्चित्त येईल, आणि क्वचित्‌ स्‍थळीं त्‍याहून विशेष असणार्‍या मनुष्‍याचा अपहार (पळविणें) केला असतां ‘‘मनूनें’’ चांद्रायण इत्‍यादि स्‍वल्‍प प्रायश्चित्त सांगितलें’’ असें म्‍हणतो तेंही बराबर नाही. कारण खोटीच बडाई मारणें, वेदाची निंदा इत्‍यादिकांत द्वादशाद्बापेक्षां निमें इष्‍टकारक आहे, आणि ‘‘मनूनें’’ सांगितलेलें थोडें प्रायश्चित्त नीच मनुष्‍याच्या अपहारा (चोरी) बद्दल आहे.

याप्रमाणें अतिदेश सांगितला.  

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP