प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १०८ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
अथ ब्रह्मचारिणो मधुमांसभक्षणे ‘‘देवलः’’ मृतान्नं मधु मांसं च यद्यश्र्नाति व्रती क्वचित्।
त्रिरात्रोपोषितः सम्यक् रात्रिमेकां जले वसेत् इदमज्ञानतः सकृद्भक्षणे। ‘‘ज्ञाने संवर्तः’’ ब्रह्मचारी तु योऽश्र्नीयान्मधु मांसं कथंचन।
प्राजापत्यं च कृत्वासौ मौंजीहोमेन शुध्यति मौंजीहोमः पुनरुपनयनं। ‘‘वसिष्ठः’’ ब्रह्मचारी चेन्मधुमांसमश्र्नीयाच्छिष्ट भोजनीयं द्वादशरात्रं चरित्वा व्रतशेषं समापयेत् सूतकभोजनेषु चैवमिति शिष्टभोजनीयं शिष्टभोजनयोग्यं विहितमित्यर्थः।
अभक्ष्यमांसादिभक्षणे प्रातिस्विकं तदपि कार्य। ‘‘अपवादमाह देवलः’’ अकामापन्नं वाजसनेये न दुष्यतीति अकामापन्नं अकामभक्षितं। ‘‘तथा ब्रह्मचार्यधिकारे बौधायनः’’ स चेव्द्याधीयीत कामं गुरोरुच्छिष्टं भैषज्यार्थे सर्वं प्राश्र्नीयाद्येनेच्छेत्तेन चिकित्सेंत्स यदागदः स्यात्तदादित्य मुपतिष्ठेद्धंसः शुचिषदिति ‘‘लघुहारीतः’’ आमिषस्य तु भांडे पक्कमश्र्नाति सव्रतः।
कुशमूलविपक्केन त्र्यहं क्षीरेण वर्तयेदिति
ब्रह्मचार्यानें अज्ञानानें व ज्ञानानें मद्य, मांस व सुतक्यांचें अन्न वगैरे खाल्ले असतां प्रायश्चित्त.
ब्रह्मचार्यास मद्य व मांस यांचें भक्षण घडलें असतां त्याविषयी देवल’’---जर ब्रह्मचारी कदाचित् मृताचें अन्न (सुतक्यांचें अन्न) मद्य, व मांस खाईल, तर त्यानें तीन दिवस पावेतों उपोषण करून एक दिवस पाण्यांत रहावें हें अज्ञानानें एक वेळां भक्षण घडलें असतां त्याविषयी जाणावे. ‘‘ज्ञानानें घडलें तर त्याविषयीं संवर्त’’---जो ब्रह्मचारी कोणत्याही प्रकारानें मद्य व मांस खाईल, त्यानें प्राजापत्य
(प्रायश्चित्त) करून पुनरुपनयन करावें म्हणजे तो शुद्ध होईल. ‘‘वसिष्ठ’’---जर ब्रह्मचारी मद्य व मांस खाईल, तर त्यानें बारा दिवस पावेतों शिष्टांस भोजन करण्यास योग्य असें जें सांगितलें असेल तें करून शेष राहिलेल्या व्रताची समाप्ति करावी. सूतकांत भोजनें केलीं असतां त्याविषयीही असेंच जाणावें. अभक्ष्य अशा मांसादिकांचें भक्षण झालें असतां आपआपलें जें (प्रायश्चित्त) सांगितले असेल तेंही करावें. ‘‘देवल अपवाद सांगतो’’---वाजसनेयानें अज्ञानानें भक्षण केलें असतां तें निंद्य होत नाही. ‘‘तसेच ब्रह्मचार्याच्या धर्माविषयीं बौधायन’’---जर तो अत्यंत व्याधिग्रस्त होईल तर त्यानें औषधासाठी गुरूचें उष्टें सगळें खावें. ज्याच्या योगानें चिकित्सा करावयाची असेल त्या योगानें चिकित्सा करावी. नंतर जेव्हा तो निरोगी होईल तेव्हां त्यानें ‘हंसः शुचिषत्’ या मंत्रानें सूर्याचें उपस्थान करावें० ‘‘लघुहारीत’’---जो ब्रह्मचारी मांसाच्या भांड्यांत शिजविलेलें अन्न खाईल, त्यानें दर्भाचें मूळ घालून शिजविलेलें दुध त्या योगानें शिजवून तीन दिवस पावेतों प्यावे.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP