प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ४८ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
क्षत्रियादीनां विशेषो भविष्ये’’ हत्वा तु क्षत्रियोविप्रं गुणाढ्यमिह कामतः। प्रायश्चित्तं चरेद्वीर विधिवत्कायशुद्धये।
लक्ष्यः शस्त्रभृतां वा स्याद्विदुषामिच्छयात्मनः। प्रास्येदात्मान मग्नौवा समिद्धे त्रिरवाक्शिरा इति
क्षत्रियानें ब्राह्मणाचा वध केला असतां प्रायश्चित्त
‘‘भविष्यांत क्षत्रिय इत्यादिकांस विशेष सांगितला आहे तो असा’’ हे शूरा ! जर एखाद्या क्षत्रियानें बुद्धिपूर्वक एखाद्या गुणवान् ब्राह्मणाचा वध केला तर त्यानें देहाची शुद्धि होण्यासाठीं विधीप्रमाणें प्रायश्चित्त करावें तें असे---त्यानें विद्वानांच्या किंवा आपल्या इच्छेनें शस्त्र धारण करणारांचे लक्ष्य व्हावें, किंवा झगझगीत अशा अग्नींत खाली मान करून तीनदां उडी टाकावी.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP