प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ११ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
इदं चार्धपादादि परिमाणमुपदिष्टमौलिकद्वादशाद्विकाद्येवापेक्ष्य प्रवर्तते।
न तु क्षत्रियादिनिमित्तकद्वैगुण्याद्यपेक्षया।
ब्रह्मचारित्वानिमित्तकं द्वैगुण्याद्वप्येवं।
अर्धपाद द्वैगुण्य त्रैगुण्यादिविधीनामुपजीव्योपजीवकाभावाभावेन परस्परानालोचनया मौलिकविधिमात्रालोचनेनैव प्रवृत्तः।
अर्धे, चतुर्थांश, दुप्पट, तिप्पट इत्यादि प्रायश्चित्ताविषयी निर्णय.
हें अर्धे, चतुर्थांश इत्यादिकांचे परिमाण सांगितलेल्या मूळ वाक्यांतील द्वादशाद्विकादिकासच उद्देशून प्रवृत्त होते. क्षत्रियादिकांस उद्देशून सांगितलेल्या दुप्पट इत्यादिकांच्या अपेक्षेनें प्रवृत्त होत नाही. ब्रह्मचारित्वाला उद्देशून सांगितलेलें दुप्पट इत्यादि प्रायश्चित्ताचें परिमाणही असेंच समजावें. कारण, अर्धे, चतुर्थांश, दुप्पट, तिप्पट इत्यादिकांच्या विधीचा कार्य ककारणाचा अभाव असून परस्परांचा संबंध नसल्यामुळे मुळांत सांगितलेल्या विधीच्या संबंधावरूनच त्या वाक्याची व्यवस्था होते.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP