मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त ५१ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ५१ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

‘‘ब्रह्मवधत्रतमन्यत्राप्यतिदिशति याज्ञवल्‍क्‍यः’’ यागस्‍थक्षत्रविट्‌घाती चरेद्बम्‍हहणि व्रतं।
गर्भहा च यथावर्णं तथा त्रेयीनिषूदक इति व्रतपदात्तदेवातिदिश्यते न मरणं।
गर्भश्र्च विन्नायां संभूतः जारजे तु ब्राह्मण्याभावान्नतद्वध इदं प्रायश्चित्तं किंतु कुंडगोलकादिवधनिमित्तमिति ‘‘निबंधकृतः’’ यद्य प्याचार्यमते कुंडगोलकादिषु ब्राह्मण्यमस्‍त्‍येव तथापि कुंडगोलकादिवधप्रायाश्चित्तमेवान्यथा तद्विधिर्व्यर्थः स्‍यात्‌। स्त्रीपुंनपुंसकविशेषत्‍वेनाज्ञातश्र्चेत्‌ स्त्रीत्‍वेन ज्ञाते उपपातकप्रायश्चित्तं ब्राह्मण्यादिस्त्रीमात्रवधस्‍योपपातकत्‍वामिति ‘‘विज्ञानेश्र्वरादयः’’
नपुंसकत्‍वेन ज्ञाते षंढवधप्रायश्चित्तं पूर्वमुक्तं

यज्ञांत क्षत्रिय व वैश्य यांचा वध व गर्भाचा वध केला असतां प्रायश्चित्त.

‘‘याज्ञवल्‍क्‍य दुसर्‍या ठिकाणीही ब्रह्महत्‍येचें प्रायश्चित्त सांगतो’’---सोमयज्ञांत असलेला क्षत्रिय व वैश्य यांचा वध करणारानें ब्रह्महत्‍येंत सांगितलेले प्रायश्चित्त करावे. गर्भाचा वध करणारानें गर्भाच्या वर्णाप्रमाणें प्रायश्चित करावे. तसेंच आत्रेयीचा वध करणारानेंही व्रत करावे. या वचनांत व्रतपद आहे त्‍यावरून व्रताच्याच अतिदेशाचें ग्रहण होतें मरण नाही. गर्भ विवाहित स्त्रीच्या ठिकाणी झालेला, जारापासून उत्‍पन्न झालेल्‍या गर्भाचे ठिकाणी ब्राह्मण्य नसल्‍यानें त्‍याच्या वधाविषयी हें प्रायश्चित्त नाही. परंतु कुंडगोळक इत्‍यादिकांच्या वधाचा संबंधानें हे प्रायश्चित्त आहे असे ‘‘निबंधकार’’ म्‍हणतात. जरी आचार्यांच्या मतानें कुंडगोळकादिकांच्या ठिकाणी ब्राह्मण्य आहेच, तथापि कुंडगोळकादिकांच्या वधाचेंच हें प्रायश्चित्त असावे. असे नसल्‍यास त्‍याचा विधि व्यर्थ होईल. हे गर्भाचें प्रायश्चित्त गर्भाचें स्त्री, पुरुष व नपुंसक यांचे विशेष ज्ञान न झाले तरच जाणावे. जर स्त्रीसंबंधि ज्ञान झालें तर उपपातकाचें प्रायश्चित्त करावे. कारण, ब्राह्मण इत्‍यादिकांच्या केवळ स्त्रीच्या वधास ‘‘उपपातकत्‍व’’ आहे असें ‘‘विज्ञानेश्र्वरादिक’’ म्‍हणतात. गर्भाचे नपुंसक संबंधि ज्ञान झाले तर नपुंसकाच्या वधाचें प्रायश्चित्त पूर्वी सांगितलेलें करावे.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP