प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १५१ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘देवद्रव्यापहारे सुमंतुः’’ देवद्विजद्रव्य हर्ताप्सु निमग्नोऽघमर्षणमावर्तयेदिति अत्र संवत्सरप्रक्रमात्तावत्कालीनावृत्तिर्ज्ञेया ‘‘स्तेयप्रसंगाद्वृत्त्युच्छेदे प्रायश्चित्तमाह ‘‘शंखः’’ यस्य यस्य तु वर्णस्य वृत्त्युच्छेदं समाचरेत्।
तस्य तस्य वधे प्रोक्तं प्रायश्चित्तं समाचरेत्। अपहृत्य तु वर्णानां विप्रोभूमिं प्रमादतः।
प्रायश्चित्तं वधे प्रोक्तं ब्राह्मणानुमते चरेदिति एतच्च वृत्त्यर्हभूम्यपहारे ज्ञेयं अत्र चापहारशब्दस्य बलात् ज्ञानपूर्व परस्वादानवाचित्वात् प्रमादत इति शास्त्रार्थापरिज्ञानपरं अत्रोभयत्रवधनिमित्तकप्रायश्चित्तातिदेशात्पादोनं तच्च कामे कामोक्तस्य अकामेप्यकामोक्तस्येति
देव व ब्राह्मण यांचें द्रव्य चोरणारास प्रायश्चित्त. वृत्तीचा उच्छेद केला असतां प्रायश्चित्त.
‘‘देवाच्या चोरीविषयीं सुमंतु’’---देव व ब्राह्मण यांचें द्रव्य चोरणारानें पाण्यांत निमग्न होऊन अघमर्षणाची आवृत्ति करावी. येथें संवत्सरा पासून आरंभ केला आहे म्हणून तों पर्यंत आवृत्ति (अघमर्षणाची) जाणावी. ‘‘शंख’’ चोरीच्या प्रसंगावरून वृत्तीच्या उच्छेदविषयीं प्रायश्चित्त सांगतो’’---जो ज्या ज्या वर्णाच्या वृत्तीचा उच्छेद करील, त्यानें त्या त्या वर्णाच्या वधाविषयीं जें प्रायश्चित्त सांगितलें असेल तें करावें. जर ब्राह्मण प्रमादानें वर्णांच्या (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांच्या) भूमीचा अपहार करील, तर त्यानें ब्राह्मणाच्या संमतीनें वधा विषयीं जें प्रायश्चित्त सांगितलें असेल तें करावें. हें प्रायश्चि त वृत्तीस योग्य असणार्या जमिनीच्या अपहारा विषयीं जाणावें. येथें अपहार शब्दाच्या बळावरून ज्ञानपूर्वक दुसर्याच्या धनाच्या ग्रहणाचें वाचित्व येतें त्यावरून ‘प्रमादतः’ हें शास्त्राच्या अर्थाचें ज्ञान चांगलें नसणें त्याविषयीं जाणावें. येथें दोन्ही ठिकाणीं वधास उद्देशून सांगितलेल्या प्रायश्चित्ताच्या अतिदेशावरून चतुर्थांशानें कमी (तीन चतुर्थांश) असें प्रायश्चित्त जाणावें. तें बुद्धिपूर्वका विषयीं सांगितलेल्याचें आणि अबुद्धिपूर्वका विषयीं अबुद्धिपूर्वकास सांगितलेल्याचें जाणावें.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP