प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ६१ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘प्रतिलोमप्रसूतानां ब्राम्हण्यादीनामकामतोवधे योगीश्र्वरः’’ दुर्वुत्तब्रम्हविट्क्षत्रशूद्रयोषाः प्रमाप्य तु।
दृतिं धनुर्बस्तमविंक्रमादृद्याद्विशुद्धये। दृतिश्र्चर्म कोशः बस्तच्छागः अविर्मेषः।
‘‘व्याघ्रस्तु’’ चतुर्णामपिवर्णानां नारीर्हत्वानवस्थिताः।
शंखशुक्त्यजमेषांश्र्च क्रमाद्दद्याद्विशुद्धय इति अत्र शंखशुक्ती अजापेक्षयाधिकमूल्ये ज्ञेये।
‘‘दृत्यादिदाने सुवर्णमपि दक्षिणा देयेत्यपरार्के’’ ‘‘कामतस्त्वाह ब्रम्हगर्भः’’ प्रतिलोमप्रसूतानां स्त्रीणां मासावधिः स्मृतः।
अंतरप्रभवाणां च सूतानांतु चतुर्द्विषट्। ब्राम्हणीक्षत्रियावैश्यानां वधे क्रमेण षट्चतुर्द्विसंख्या मासा इत्यर्थः शूद्रायां त्वेकः अंतरप्रभवाणामिति व्याख्यातम् वेश्यावधे किंचिद्देयं ‘‘वैशिके न किंचिदिति गौतमोक्तेः’’ किंचिज्जलं।
‘‘शूद्रायामाविकं वेश्यां हत्वा दद्याज्जलंनर इत्यंगिरस उक्तेः।’’
‘‘अपरार्के तु गौतमीये’’ वैश्ये किंचिन्न देयमित्यर्थं कृत्वा आंगिरसे वेश्यां हत्वा जलं स्पृशेदिति पठितम्।
व्यभिचारी अशा ब्राम्हण वगैरेंच्या स्त्रियांचा वध झाला तर प्रायश्चित्त.
‘‘प्रतिलोमांपासून प्रसूत झालेल्या ब्राह्मणी वगैरेंचा अज्ञानानें वध झाला असतां त्याविषयीं याज्ञवल्क्य’’ ---व्यभिचारी अशा ब्राह्मण क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांच्या स्त्रियांचा वध केला असतां क्रमानें चामड्याची पिशवी, धनुष्य, बोकड व मेंढा यांचे दान शुद्धि होण्याकरितां द्यावें. ‘‘व्याघ्र’’ तर---ब्राम्हणादि चार वर्णांच्या व्यभिचारी स्त्रियांचा वध केला असतां शुद्धि होण्याकरितां क्रमानें शंख, शिंपा, बोकड व मेंढा यांचें दान करावे. येथें शंख व शिंपा यांची किंमत बोकडाच्या किंमती पेक्षां अधिक जाणावी. ‘‘चामड्याची पिशवी इत्यादिकांच्या दानावर सोनेंही दक्षिणा द्यावी असें अपरार्कांत आहे. ‘‘बुद्धिपूर्वक वध केला असतां ब्रम्हगर्भ म्हणतो’’---प्रतिलोमांपासून प्रसूत झालेल्या ब्राह्मणी, क्षत्रिया, वैश्या व शूद्रा यांचा बुद्धिपूर्वक वध केला असतां क्रमानें सहा, चार, दोन व एक असे महिने प्रायश्चित्त जाणावे. सूत वैदेह वगैरेंचा वध केला असतां सहा, चार व दोन महिने प्रायश्चित्त जाणावें. वेश्येचा वध केला असतां किंचित् (दान) द्यावे. कारण, ‘‘वेश्येच्या कर्मानें उपजीविका करणारीचा (वेश्येचा) वध केला असतां किंचित् द्यावे’’ असें गौतमाचें म्हणणें आहे. किंचित् म्हणजे पाणी. कारण, ‘‘मनुष्यानें शूद्राच्या स्त्रीचा व वेश्येचा वध केला असतां क्रमानें मेंढा व पाणी द्यावे’’ असें अंगिरसाचें म्हणणें आहे. ‘‘अपरार्कांत तर गौतमाच्या वचनाचा---वेश्येच्या वधांत कांही देऊं नये असा अर्थ करून---अंगिरसाच्या वचनांत वेश्येचा वध केला असतां पाण्यानें आचमन करावे’’ असा पाठ केला आहे असें म्हटलें आहे.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP