अथाभोज्यान्नाः
‘‘व्यासः’’ गृध्रोद्वादश जन्मानि दश जन्मानि सूकरः।
श्र्वा चैव सप्त जन्मानीत्येवं मनुरुवाचह। शूद्रान्नेनोदरस्थेन यः कश्चिन्म्रियते द्विजः।
सभवेत्सूकरोग्राम्यस्तस्य वा जायते कुले। ‘‘आपस्तंबः’’ आहिताग्निस्तु योविप्रः शूद्रान्नेन प्रर्वतते।
पंच तस्य विनश्यंति आत्मा ब्रह्म त्रयोऽग्नयः
‘‘किंचिदपवदति हारीतः’’ कंदुपक्कं स्नेहपक्कं पायसं दधि सक्तवः।
एतानि शूद्रान्नभुजोभोज्यानि मनुरब्रवीत् कंदुर्भ्राष्ट्रं ‘‘क्लीबेंबरीषं भ्राष्ट्रोना कंदुर्ना स्वदेनी स्त्रियामिति कोशात्।
‘‘याज्ञवल्क्यः’’ शूद्रेषु दासगोपालकुलमित्रार्धसीरिणः। भोज्यान्ना नापितश्र्चैव यश्र्चात्मानं निवेदयेत्।
एतेषां चान्नं संप्रोक्ष्य ग्राह्यं ‘‘संप्रोक्षयित्वा गृण्हीयाच्छूद्रान्नं गृहमागतमिति विष्णुपुराणात्।
‘‘आपस्तंबः’’ आममन्नं मधु घृतं धानाः क्षीरं तथैव च। गुडमांसरसा ग्राह्या निवृत्तेनापि शूद्रतः।
‘‘सुमंतुः’’ गोरसश्र्चैव सक्तुं च तैलं पिण्याकमेव च। अपूपान् भक्षयेच्छूद्राद्यच्चान्यत्पयसा कृतं।
‘‘पराशरः’’ घृतं तैलं तथा क्षीरं गुडं तैलेन पाचितं। गत्वा नदीतीरे विप्रोभुंजीयाच्छूद्रभोजितं।
आरनालं तथा क्षीरं कांजिकं दधि सक्तवः। स्नेहपक्कं तथा चान्नं शूद्रस्यापि न दुष्यति।
‘‘लिखितः’’ भुक्त्वा वार्धुषिकस्यान्नमव्रतस्यासुतस्य च।
शूद्रस्य च तथा भुक्त्वा त्रिरात्रं स्यादभोजनं इदमकामतः।
‘‘कामतस्तु शूद्रादीनुक्त्वा सुमंतुः’’ भुंजानोऽन्यतमस्यान्न ममत्या क्षपणंत्र्यहं। मत्या भुक्त्वा चरेत्कृच्छ्रं रेतोविण्मूत्रमेव चेति।
आवृत्तावधिकं कल्प्यं। ‘‘याज्ञवल्क्यः’’ यतिश्र्च ब्रह्मचारी च पक्वान्नस्वामिनावुभौ। तयोरन्नं न भोक्तव्यं भुक्त्वा चांद्रायणं चरेत्
ज्यांचें अन्न खाण्यास योग्य नाहीं ते.
द्विजानें शूद्राचें अन्न खाल्लें तर त्याचें गिधाड वगैरेंच्या योनींत जन्म होते. अग्निहोत्र्यास मिळणारें फळ.
‘‘व्यास’’---द्विजानें शूद्राचें अन्न खाल्ले तर तो बारा जन्मपर्यंत गिधाड, दहा जन्म डुकर, व सात जन्म कुत्रा होतो असें मनूनें सांगितलें. जो कोणी द्विज शूद्राचें अन्न पोटांत असून मरेल तो सात जन्मपर्यंत गांवडुकर होईल किंवा त्याच्या (शूद्राच्या) कुळांत जन्म घेईल. ‘‘आपस्तंब’’---जो अग्निहोत्री ब्राह्मण शूद्राचें अन्न घेईल, त्याचे आत्मा, वेद व तीन अग्नि हे पाच नाहीसे होतात.
कढईत तळलेले, तेलांत तळलेलें, दुध वगैरे ही शूद्रापासून घेऊन खाण्यास हरकत नाही. घेण्यास योग्य ते.
‘‘हारीत किंचित् अपवाद सांगतो’’---कंदूंत पक्व केलेलें, दुध, दहि व सातु ही शूद्राचें अन्न न खाणार्यासही खाण्यास योग्य आहेत असें मनूनें सांगितलें. कंदु म्हणजे कढई. कारण ‘‘अंबरीष हें नपुंसकलिंगी, भ्राष्ट्र पुल्लिंगी, कंदु पुल्लिंगी व स्वेदनी स्त्रिलिंगी’’ असा कोश आहे. ‘‘याज्ञवल्क्य’’---शूद्रांत दास, गवळी, कुलमित्र, अर्धसीरि, न्हावी व जो शरीर, वाणी व मन यांच्या योगानें मी तुझाच आहे असे निवेदन करणारा तो यांचें अन्न भोजन करण्यास योग्य आहे. यांचें अन्न प्रोक्षण करून घ्यावे. कारण ‘‘घरीं आलेलें शूद्राचें अन्न प्रोक्षण करून घ्यावे’’ असें विष्णुपुराणांत आहे. ‘‘आपस्तंब’’---कच्चें धान्य, मध, तूप, लाह्या, दुध, गुळ व मांसाचा रस हे विषयापासून निवृत्त झालेल्यानेंही शूद्रापासून घ्यावे. ‘‘सुमंतु’’---गोरस, सातु, तेल, तिळाची पेंड व अपूप हे शूद्रापासून घेऊनही खावे. तसेंच जें दुसरें दुधांत केलें असेल तेंही खावे. ‘‘पराशर’’---तुप, तेल, दुध, गुळ व तेलांत तळलेलें हें शूद्रानें ब्राह्मणास खाण्यास दिलें असतां त्यानें नदीच्या कांठीं जाऊन खावे. आरनाल, दुध, कांजी, दहि, सातु व तेलांत तळलेलें अन्न ही शूद्राचीही दूषित नाहींत.
व्रत न करणारा, निपुत्रिक, व्याजाचा धंदा करणारा, शुद्र, संन्याशी व ब्रह्मचारी यांचें प्रायश्चित्त.
‘‘लिखित’’---व्रत न करणारा निपुत्रिक, व्याजाचा धंदा करणारा, व शूद्र यांचें अन्न खाल्लें असतां तीन दिवस उपास करावा. हें (प्रायश्चित्त) अबुद्धिपूर्वकाविषयीं जाणावें. ‘‘बुद्धिपूर्वकाविषयीं तर शूद्रादिकांस सांगून सुमंतु’’ ---अज्ञानानें यांपैकी एकाचें अन्न खाल्लेंतर तीन दिवस उपास करावा. बुद्धिपूर्वक खाल्लें तर कृच्छ्र करावें. तसेंच रेत, विष्ठा व मुत ही खाल्लीं असतां करावें. आवृत्ति (अभ्यास) असतां अधिक (प्रायश्चित्त) कल्पावे. ‘‘याज्ञवल्क्य’’---संन्याशी व ब्रह्मचारी या दोघांचें (शिजलेल्या) अन्नावर स्वामित्व असलें तर त्यांचें अन्न खाऊं नये. जर खाल्लें तर चांद्रायण करावें.