प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त २७ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
अरंतरं चतुर्थ वारिस्नानमुक्तं
तत्रमंत्रो ‘‘ब्रह्मांडपुराणे’’ आपो अस्मानितिह्युक्त्वा भास्कराभिमुखः स्थितः। इदं विष्णुर्जपित्वा चप्रतिस्त्रोतो निमज्जति।
‘‘मात्स्ये’’ सावित्र्यादाय गोमूत्रं गंधद्वारेति वै शकृत्। आप्यायस्वेति च क्षीरं दधिक्रा०णेति वै दधि।
ते जोसीति घृतं तद्वद्देवस्यत्वेति चोदकं।
कुशमिश्रं जपे द्विद्वान् पंचगव्यं भवेत्तत इति ‘‘पाराशर्ये तु’’ तेजोसि शुक्रमित्याज्यं देवस्यत्वा कुशोदकं।
पंचगव्यमृचा पूतं स्थापये दग्निसन्निधाविति द्वितीयः श्र्लोक उक्तः।
देवस्यत्वेत्यनंतर मभिषिंचामीति वाक्यशेषः पूरणीय इति ‘‘निबंधकृतः’’
यद्यपि ‘‘मात्स्ये’’ देवप्रतिष्ठायां देवस्नानार्थ पंचगव्यग्रहणे एते मंत्रा उक्ताः ‘‘पराशरेण’’ च ब्रह्मकूर्चप्रकरणे तथा प्युभयत्रापि कुशोदकसहितानां षप्णां गोमूत्रादीनां पंचगव्यं भवेत्तत इति पंचगव्यमृचा पूतमिति च पंचगव्यमिति परि भाषेति गम्यते।
तस्याश्र्च प्रकरणेन नियमाभावाद्यत्र पंचगव्यविनियोगस्तत्रैतदेव मंत्राद्यवगंतव्यं।
अन्यथा गव्यमिति तद्धितस्य गव्यशृंगतक्रादिसाधारण्येन तेनापि स्नानं स्यात्।
केचित्तु मलापकर्षणं कार्य बाह्यशौचोपसिद्धय इति बाह्यशारीरमलशोधनमात्रार्थत्वादमंत्रकाण्येव तानीत्याहुः।
‘‘जमदग्निः’’ हिरण्यश्रृंगं वरुण मित्यपोभिप्रपद्यते। सुमित्र्या इत्यपः स्पृष्ट्वा दुर्मित्र्यास्तु बहिः क्षिपेत्।
यदपां क्रूरमित्यपस्त्रिरालोड्य तु पाणिना।
या नंतर चवथें पाण्याचें स्नान सांगितलें.
पाण्याचे स्नानाचा विधि
त्या विषयीं मंत्र ‘‘ब्रह्मांडपुराणांत’’ ‘‘आपो अस्मान्’’ हा मंत्र म्हणून सूर्याकडे तोंड करून उभे रहावे. नंतर ‘‘इदं विष्णुः’’ हा मंत्र म्हणून प्रवाहाकडे तोंड करून स्नान करावें. ‘‘महार्णवांत’’ विकल्पानें दोन मंत्र सांगितले ते असे-‘‘इदमापः प्रवहत’’ ही ॠचा किंवा ‘‘आपोहिष्ठा’’ या तीन ॠचा या विषयीं मूळ पहावें.
या नंतर पंचगव्यांची स्नानें सांगितली.
त्या विषयी त्यांच्या ग्रहणाचें मंत्र ‘‘मत्स्यपुराणांत’’ विद्वानानें गायत्रीमंत्रानें गोमूत्र घ्यावे. ‘‘गंधद्वारां’’ या मंत्रानें गाईचे शेण, ‘‘आप्यायस्व’’ या मंत्रानें दुध, ‘‘दधिक्राव्णो’’ या मंत्रानें दहि ‘‘तेजोसि’’ या मंत्रानें तूप, व ‘‘देवस्यत्वा’’ या मंत्रानें पाणी घेऊन सर्व एकत्र करून त्यांत दर्भ टाकावे म्हणजे ते पंचगव्य झाले. ‘‘पराशरस्मृतींत’’ तर ‘‘तेजोसि शुक्रं’’ यानें तूप, ‘‘देवस्यत्वा’’ यानें दर्भाचें पाणी या प्रमाणें मंत्रानें पंचगव्य करून अग्नीच्या जवळ ठेवावे’’ असा ‘‘मत्स्यपुराणांतील’’ दुसर्या श्र्लोका ऐवजी हा दुसरा श्र्लोक सांगितला, ‘‘देवस्यत्वा’’ या नंतर ‘‘अभिषिंचामि’’ असें वाक्य योजावें असें ‘‘निबंधकार’’ म्हणतात. जरीही ‘‘मत्स्यपुराणांत’’ देवप्रतिष्ठेंत देवास स्नान घालण्याकरितां पंचगव्य करण्याविषयी हे मंत्र सांगितले आहेत, आणि ‘‘पराशरानें’’ ब्रह्मकूर्च प्रकरणांत (सांगितले) तरी पण दोन्ही ठिकाणीं दर्भांच्या पाण्यानें युक्त अशा गोमूत्रादि सहांचेच पंचगव्य होते असे म्हटले, आणि मंत्रानें पंचगव्य पवित्र होते अशी पंचगव्याची परिभाषा दिसते आणि त्या परिभाषेचा प्रकरणें करून नियमाचा अभाव आहे, म्हणून ज्या ठिकाणीं पंचगव्याचा विनियोग असेल त्याच ठिकाणीं हें मंत्रादि जाणावे. नाही तर ‘‘गव्य’’ या तद्धिताचें गाईचें शिंग, ताक इ त्यादिकांशी साधारण्य असल्यानें त्यांच्या योगानेंही स्नान होईल. ‘‘कित्येक तर’’ शरीराच्या बाहेरील भागाची शुद्धि होण्याकरितां मलापकर्षण स्नान करावे.’’ या वचनावरून शरीराच्या बाहेरील मळाचा नाश होण्याकरितांच ती (पंचगव्यें) अमंत्रक घ्यावी’’ असें म्हणतात. ‘‘जमदग्नि’’-‘‘हिरण्यशृंग वरुणं’’ या मंत्रानें उदकाजवळ जावे. ‘‘सुमित्रा’’ या मंत्रानें पाण्यास स्पर्श करून ‘‘दुर्मित्र्याः’’ यानें बाहेर टाकावें. आणि ‘‘यदपां क्रूरं’’ या मंत्रानें हातानें पाणी तीनदां ढवळावे.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP