प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ९ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
ब्रह्मचारिणो द्वैगुण्योक्तिः षोडशवर्षोर्ध्व ‘‘षोडशवर्षर्पयंर्तमाहांगिराः’’
अशीतिर्यस्य वर्षाणि बालोवाप्यूनषोडशः।
प्रायश्चित्तार्ध मर्हांति स्त्रियो रोगिण एव चेति ‘‘आदिपर्वणि’’ आचतुर्दशका द्वर्षान्न भविष्यति पातकं।
परतः कुर्वतामेव दोष एव भविष्यति।
‘‘अंगिराः’’ अर्वाक् तु द्वादशाद्वर्षादशीतेरूर्ध्वमेव वा।
अर्धमेव भवेत्पुंसा तुरीयं तत्र योषितामिति अत्रोच्चावचावधितारतम्यं शक्तितो ज्ञेयं।
‘‘यत्तु विष्णुः’’ स्त्रीणामर्धं प्रदातव्यं वृद्धानां रोगिणां तथा।
पादो बालेषु दातव्यः सर्वपापेष्वयं विधिरिति तदुपनयनादर्वाक् ज्ञेयम्
म्हातारा, स्त्री, बालक व रोगी यांच्या प्रायश्चित्ताबद्दल.
ब्रह्मचार्यास दुप्पट प्रायश्चित्त सांगितलें तें सोळा वर्षांच्या पुढें समजावे. ‘‘अंगिरस् सोळा वर्षां पर्यंत सांगतो’’-ज्याला ऐंशी वर्ष झाली आहेत किंवा सोळा वर्षांहून कमी उमर आहे असा मुलगा, स्त्रिया, व रोगी हे अर्ध्या प्रायश्चित्ताला योग्य आहेत. ‘‘आदिपर्वांत’’ चौदा वर्षेपर्यंत पातक होत नाही. त्या पुढें पातक करणारांसच दोष होईल. ‘‘अंगिरस्’’-बारा वर्षांच्या आंत व ऐशीं वर्षांच्या पुढें असणार्या पुरुषांस अर्धे प्रायश्चित्त असावे. वर सांगितलेल्या उमरीच्या स्त्रियांस चतुर्थांश प्रायश्चित्त असावें. या वरील वाक्यांत कमी जास्त वयाचे तारतम्य वरून जाणावें. ‘‘ जे तर विष्णु’’ ‘स्त्रिया वृद्ध, व रोगी यांस अर्धे प्रायश्चित्त द्यावें. बाळकांस चतुर्थांश द्यावें. हा सर्व पापांच्या ठिकाणीं विधि जाणावा’ असें म्हणतो तें उपनयन होण्याच्या पूर्वी समजावें.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP