मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त ६० वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ६० वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

‘‘अथ स्त्रीवधे हारीतः’’ षड्‌वर्षाणि राजन्ये त्रीणि वैश्ये अध्यर्धं क्षत्रियवत्‌ ब्राम्‍हणीषु वैश्यवत्‌ क्षत्रियासु शूद्रवद्वैश्यासु शूद्रार्धमितरासु शूद्रार्धं नवमासिकं इतरासु शूद्रासु एतच्च श्रोत्रियपत्‍न्‍या गुणवत्‍याः कामतो वधविषयं। सपत्‍नमातृभगिनीदुहितृस्‍नुषात्‍मत्‍न्‍याद्यतिप्रत्‍यासन्नावधविषयं च। सपत्‍नभगिनीपितृष्‍वसृमातृष्‍वसृमातुलानीपितृव्यपत्‍नीभ्रातृभार्याश्र्वश्रूणां वधेप्येतान्येव पादोनानि सपिंडसगोत्राणां वधेऽर्धानि।
‘‘आसामेव श्रोत्रियपत्‍नीत्‍वादिगुणविशेषे तत्तत्‍प्रायश्चित्तं द्विगुणं कल्‍प्‍यमिति निबंधकृतः’’ आसामेवाकामतोवधे त्‍वेतदेवार्धं कल्‍प्‍यं।
‘‘यत्तु गौतमः’’ शूद्रे संवत्‍सरं वृषभैकादशाश्र्च गा दद्यादनात्रेय्यां चैवमिति तदगुणविप्रमात्रपत्‍नीवधविषयं।
‘‘यत्तु शातापतः’’ स्त्रीघाती कृच्छ्रं षण्मासमिति तदत्रैवाकामतोद्रष्‍टव्यम्‌

ब्राह्मण क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांच्या स्त्रियांच्या वधाचें प्रायश्चित्त. सावत्र मावशी वगैरेंच्या वधाचें प्रायश्चित्त.

‘‘स्त्रीच्या वधा विषयी हारीत’’---क्षत्रियाविषयी सहा वर्षे, वैश्याविषयी तीन वर्षे, शूद्राविषयी दीड वर्ष. ब्राम्‍हणांच्या स्त्रियांच्या वधाविषयी क्षत्रिया प्रमाणें प्रायश्चित्त (सहा वर्षें), क्षत्रियांच्या स्त्रियांविषयी वैश्याप्रमाणें, वैश्यांच्या स्त्रियांविषयी शूद्राप्रमाणें व शूद्राच्या स्त्रियांविषयी नऊ महिने प्रायश्चित्त होय. हे वेद शिकलेल्‍या ब्राम्‍हणाच्या गुणवान्‌ स्त्रीचा बुद्धिपूर्वक वध केला असतां त्‍याविषयी जाणावें, आणि सावत्र आई, बहीण, मुलगी सून, आपली बायको इत्‍यादि नजीक संबंधाच्या स्त्रियांच्या वधाविषयीं जाणावे. सावत्र बहीण, आते, मावशी, मामी, काकी, भावजय व सासू यांच्या वधाविषयी हीच (प्रायश्चित्ते) चतुर्थांशानें कमी अशी जाणावी. आपल्‍या गोत्रांत उत्‍पन्न झालेल्‍या सपिंडांच्या वधाविषयी अर्धीं (प्रायश्चित्तें) जाणावी. यांच्याच ठिकाणी वेद शिकलेल्‍या ब्राम्‍हणाचा स्त्रीत्‍वादि विशेष गुण असतां तें तें प्रायश्चित्त दुप्पट कल्‍पावें. ‘‘जें तर गौतम’’ शूद्राच्या वधाविषयी एकाद्ब प्रायश्चित्त करावें, आणि बैल ज्‍यांत अकरावा आहे अशा दहा गाई द्यावा. याचप्रमाणें आत्रेयी जी नसेल तिच्या विषयी जाणावे.’’ असें म्‍हणतो तें पातिव्रत्‍यादि गुणांनीं रहित अशा ब्राह्मणमात्राच्या स्त्रीच्या वधाविषयी जाणावे. जें तर शातातप’’ स्त्रीचा वध करणारानें सहा महिने पर्यंत कृच्छ्र करावे’’ असें म्‍हणतो तें याच विषयीं बुद्धिपूर्वक वध केला नसतां जाणावें.


Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP