प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १२८ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
अतांत्यजभांडजले ‘‘पराशरः’’ भांडस्थमंत्यजानां तु जलं दधि पयः पिबेत्। ब्राह्मणः क्षत्रियो वैश्यः शूद्रश्र्चैव प्रमादतः।
ब्रह्मकूर्चोपवासेन द्विजातीनां तु निष्कृतिः। शूद्रस्य चोपवासेन तथा दानेन शक्तित इति इदकामतः।
कामतस्त्वापस्तंबः’ मदांधम्लेंछभाडेभ्योयस्त्वापः पिबेते द्विजः। कृच्छ्रपादेन शुध्येत पुनःसंस्कारमर्हति
ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे अंत्यजांच्या भांड्यांतील पाणी वगैरे पितील तर प्रायश्चित्त.
अंत्याजांच्या भांड्यांतील पाण्याविषयीं ‘‘पराशर’’ जर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हें अज्ञानानें अंत्यजांच्या भांड्यांतील पाणी, दहि व दूध पितील, तर द्विजांची (ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांची) ब्रह्मकूर्चाच्या उपवासानें शुद्धि होईल व शूद्राची उपास केल्यानें व शक्तिप्रमाणें दान दिल्यानें शुद्धि होईल. हें अज्ञानाविषयीं जाणावे. बुद्धिपूर्वकाविषयीं तर ‘‘आपस्तंब’’---जो द्विज मद्यपी व म्लेंच्छ यांच्या भांड्यांतील पाणी पिईल, तो कृच्छ्रपादानें शुद्ध होईल व पुनः संस्कारास पात्र होईल.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP